भाजपच्या हतबलतेतून नाशिककरांचा विश्‍वासघात झाला?

महापालिकेतील भाजपच्या सत्तेला साडेचार वर्षे उलटल्यानंतर प्रशासन ऐकत नसल्याची उपरती महापौर सतीश कुलकर्णी यांना सुचली. यावरून सत्ताधारी भाजपचा प्रशासनावर वचक नसल्याचे स्पष्ट होत असून, महापौरांनी हतबलता व्यक्त करून नाशिककरांचा विश्‍वासघात केला.
Ajay Boraste
Ajay Boraste

नाशिक : महापालिकेतील भाजपच्या सत्तेला साडेचार वर्षे उलटल्यानंतर प्रशासन ऐकत नसल्याची उपरती महापौर सतीश कुलकर्णी यांना सुचली. (Mayor Satish Kulkarni saying administration doesn`t listen him after four and half year)  यावरून सत्ताधारी भाजपचा प्रशासनावर वचक नसल्याचे स्पष्ट होत (it proves bjp does`nt have comand on administration) असून, महापौरांनी हतबलता व्यक्त करून नाशिककरांचा विश्‍वासघात केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते (Ajay Boraste) यांनी केला. 

महापौर सतीश कुलकर्णी यांनी दोन दिवसांपूर्वी प्रसिद्धिपत्रकाद्वारे प्रशासनातील त्रुटी मांडताना असमन्वय असल्याने शहराचा विकास खुंटल्याचा आरोप केला होता. प्रशासन प्रमुख म्हणून आयुक्त महापौरांच्या अजेंड्यावर असले, तरी विरोधी पक्षाने महापौरांनी आयते दिलेल्या संधीचे सोने करत महापौरांसह भाजपवर शाब्दिक हल्लाबोल केला. 

श्री. बोरस्ते म्हणाले, की नाशिक दत्तक घेत असल्याचे आश्‍वासन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर नाशिककरांनी प्रथमच एकहाती सत्ता दिली. मात्र, साडेचार वर्षांत दत्तक नाशिकचा शब्द पाळला गेला नाही. अंतर्गत कुरघोडी, ठेकेदारांवर विशेष मेहेरनजर आदी कारणांमुळे नाशिकचा विकास खुंटला. सहा महिन्यांवर महापालिकेच्या निवडणुका आल्या असताना, भाजपला विकासकामांची आठवण होत आहे. 

साडेचार वर्षांत काहीच करता आले नाही. आता प्रशासनाला दोषी ठरवून आगपाखड केली जात आहे. भाजपने प्रशासनावर आरोप करून सत्ताधाऱ्यांचा अंकुश नसल्याचे दाखवून दिले. प्रशासनातील अधिकाऱ्यांशी साडेचार वर्षांत युती केली. आता त्याच अधिकाऱ्यांवर होणारी टीका आश्‍चर्यकारक आहे. प्रशासनावर अंकुश ठेवण्याची जबाबदारी सत्ताधारी पक्ष व नगरसेवकांची आहे. मात्र, महापौरांनी ऑनलाइन सभा घेऊन नगरसेवकांना प्रशासनाला प्रश्‍न विचारण्याची संधी दिली नाही. 

जादा विषयांमधील अशासकीय प्रस्ताव मंजूर करून उखळ पांढरे केले. महापौरांवर दबाव असल्याचे त्यांनी मनमोकळे सांगितले असते, तर शिवसेना त्यांच्या पाठीशी उभी राहिली असती. मात्र, प्रशासनाशी त्यांनी सोयीने युती केली. आता कर्जाचा डोंगर उभा करून विकासाचे उसणे अवसान आणण्याचा प्रयत्न होत आहे. 
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com