भाजपचा शिवसेनेच्या सुधाकर बडगुजर यांना ‘दे धक्का’ 

https://www.sarkarnama.in/top-news-mobile-nashik/agitation-against-centre-government-obc-reservation-maharashtra-politicsत्रिमूर्ती चौक व मायको सर्कल येथील उड्डाणपुलाला विरोध करत शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात दोन हात करणाऱ्या भाजपने आज एक पाऊल पुढे जात बडगुजर ॲन्ड बडगुजर कंपनीच्या दहा वर्षांतील ठेक्याची माहिती मागवीत जोरदार धक्का देण्याची तयारी केली आहे.
Sudhakar Badgujar
Sudhakar Badgujar

नाशिक : त्रिमूर्ती चौक व मायको सर्कल येथील उड्डाणपुलाला (BJP opposed Cidce flyover bridges) विरोध करत शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर (Shivsena Sudhakar Badgujar) यांच्या विरोधात दोन हात करणाऱ्या भाजपने आज एक पाऊल पुढे जात बडगुजर ॲन्ड बडगुजर कंपनीच्या दहा वर्षांतील ठेक्याची (Last ten years Information) माहिती मागवीत जोरदार धक्का देण्याची तयारी केली आहे. सभागृहनेते कमलेश बोडके यांनी आयुक्त कैलास जाधव यांना पत्र लिहून माहिती मागविल्याने महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपकडून शिवसेनेला घेरताना निवडणुकीचे अप्रत्यक्ष रणशिंग फुंकले. 

शहरात मायको सर्कल व त्रिमूर्ती चौक येथे अडीचशे कोटी रुपयांचे दोन उड्डाणपूल तयार केले जाणार आहे. परंतु उड्डाणपुलावरून सत्ताधारी भाजप व शिवसेनेत आव्हाने-प्रतिआव्हान दिली जात असल्याने राजकारण तापले आहे. महासभेत ‘उड्डाणपूल रद्द करून दाखवा, राजकारण सोडेन’, असे आव्हान श्री. बडगुजर यांनी दिल्यानंतर महापौर सतीश कुलकर्णी यांनी उड्डाणपुलांच्या कामाच्या आग्रहा मागचे गौडबंगाल काय, असा सवाल करत बडगुजर यांची कोंडी केली.

त्यानंतर सभागृहनेते कमलेश बोडके यांनी रस्ते कामाचा मुद्दा उपस्थित करत ठेकेदारांची रिंग करणारा शिवसेनेचा नेता कोण, असा सवाल उपस्थित करताना श्री. बडगुजर यांच्याकडे अंगुलिनिर्देश केला. तसेच, उड्डाणपुलाच्या कामात सकृतदर्शनी ठेकेदार आणि शिवसेनेचा संबंधित पदाधिकाऱ्यांचे हितसंबंध दिसत असून, यासंदर्भातील सर्व कागदपत्रे, पुरावे पडताळून सादर केले जातील.

उड्डाणपुलाचे काम रद्द न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. बडगुजर ॲन्ड बडगुजर कंपनी संबंधित असल्याचा दावा करीत दहा वर्षांत महापालिकेत या कंपनीच्या माध्यमातून किती कोटी रुपयांची कामे झाली, याची माहिती सभागृहनेते बोडके यांनी मागविल्याने संघर्ष विकोपाला जात असल्याचे दिसून येत आहे. महापालिका निवडणुकीपूर्वीच राजकीय फटाके फुटण्यास सुरवात झाली आहे. 

भाजपची निवडणूक व्यूहरचना 
गेल्या साडेचार वर्षांत भाजपच्या सत्ताकाळात ठेकेदारांचा पक्ष असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला. आता भाजपने शिवसेनेच्या नेत्यांच्या ठेक्यांची पोलखोल करण्यासाठी आक्रमक भूमिका घेत शिवसेनेची कोंडी करण्याची व्यूहरचना आखली आहे. भाजपच्या या निवडणूक व्यूहरचनेला आता शिवसेना कसे उत्तर देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com