गिरीश महाजन, आधी हिंदुत्व सिद्ध करा..मग बोला : गुलाबराव पाटील - bjp girish mahajan should first prove hindutva then speak gulabrao patil | Politics Marathi News - Sarkarnama

गिरीश महाजन, आधी हिंदुत्व सिद्ध करा..मग बोला : गुलाबराव पाटील

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 19 जून 2021

हिंदुत्व काय आहे हे भाजपने आम्हाला सांगण्याची गरज नाही.

जळगाव : बाबरी मशिदीचा ढाचा पडला तेव्हा भाजप चे ७२ नेते गप्प राहिले, मात्र बाळासाहेब ठाकरे हा एकच बाप होता, त्यांनी मान्य करून हिंदुत्व दाखवून दिले. त्यामुळे गिरीश महाजन यांनी बोलू ते सिद्ध करून दाखवावे, असे आवाहन शिवसेना नेते, मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले पत्रकारांशी बोलताना दिले.bjp girish mahajan should first prove hindutva then speak gulabrao patil

भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार गिरीश महाजन यांनी शिवसेनेवर टीका करताना म्हटले होते आणि की, हिंदुत्व विरोधात शिवसेना ही काँग्रेस व एमआयएम पेक्षाही पुढे गेली आहे. त्याला उत्तर देताना शिवसेना नेते व राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता हे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, बाबरी मशिदीचा ढाचा पडला तेव्हा भाजपचे ७२ नेते होते. मात्र त्यांनी मान्य केले नाही. परंतु बाळासाहेब ठाकरे हा एकमेव बाप होता त्यांनी बाबरी ढाचा पाडण्यात आमचा हात काय आणि पाय काय आहे दाखवून दिले. त्यामुळे हिंदुत्व काय आहे हे भाजपने आम्हाला सांगण्याची गरज नाही. गिरीश महाजन यांच्या भाजपने अगोदर हिंदुत्व सिद्ध करून दाखवावे, मग त्यावर बोलावे असे आवाहन ही पाटील यांनी दिले.

यावेळी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या आरोपाला उत्तर देताना पाटील म्हणाले, शिवसैनिक महिलांवर कधीही हात उचलणार नाही,कारण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आम्हाला शिकवण आहे. सभेतही आम्ही अगोदर महिलांना घरी जाण्यास रस्ता करून देतो. त्यामुळे शिवसैनिक महिलेवर हल्ला करणे शक्य नाही. त्या दिवशी भाजपच्या महिला होत्या शिवसेनेच्या महिला होत्या या गर्दीत महिलेला धक्का लागला असेल मात्र भगिनीवर बघून हल्ला करण्याचा प्रकार झाला या गोष्टीला मी मान्यता देत नाही.
Edited by : Mangesh Mahale

प्रसाद लाड यांनी परबांना ठणकावले..पोलिसांच्या आड लपून हल्ला करु नका.. 
मुंबई : " भाजपच्या कार्यकर्त्यांना चिथावणी देणारे शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी पोलिसांच्या पदराआड लपून भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला करू नये. त्यांनी पोलिसांचा पदर सोडून समोरासमोर यावे, त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल,"  अशा शब्दात महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष व आमदार प्रसाद लाड यांनी परब यांना ठणकावले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख