त्र्यंबकेश्‍वर, रामकुंडावर "भाजप'चा मंदिर उघडण्यासाठी घंटानाद! 

कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे राज्यातील मंदिरे व धार्मिक संस्था बंद आहेत. राज्य शासनाने अनलॉकडाऊनची प्रक्रीया सुरु केली आहे. त्यामुळे मंदिरे देखील खुली करावीत, या मागणीसाठी आज भारतीय जनता पक्ष व विविध अध्यात्मिक संस्थांतर्फे घंटानाद आंदोलन करण्यात आले.
त्र्यंबकेश्‍वर, रामकुंडावर "भाजप'चा मंदिर उघडण्यासाठी घंटानाद! 

नाशिक : कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे राज्यातील मंदिरे व धार्मिक संस्था बंद आहेत. राज्य शासनाने अनलॉकडाऊनची प्रक्रीया सुरु केली आहे. विविध दुकाने, सस्था, मॉल्स सुरु करण्यात आले आहेत. त्यामुळे मंदिरे देखील खुली करावीत, या मागणीसाठी आज भारतीय जनता पक्ष व विविध अध्यात्मिक संस्थांतर्फे घंटानाद आंदोलन करण्यात आले. त्र्यंबकेश्‍वर मंदिर आणि नाशिकला रामकुंडासह शहरात अठरा ठिकाणी हे आंदोलन झाले. 

"दार फउघड उद्धवा दार उघड' अशी मागणी करीत सकाळी अकराला घंटानाद झाला. यासंदर्भात भाजपचे नेते म्हणाले, गेल्या पाच महिन्यांपासून ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर व विविध प्रमुख मंदिरे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आले आहेत. कोरोना संकटामुळे भाविक, समाज तसेच मंदिरावर अवलंबून असलेले व्यावसायिक मानसिक व आर्थिकदृष्ट्या खचले आहेत. हातावर पोट असलेले अनेक घटक बेरोजगार झाले आहेत. रोजच्या रोजंदारीवर अवलंबून असणाऱ्यांना हलाखीचे दिवस आले आहेत. मंदिराचा दरवाजा उघडल्याशिवाय येथे भाविक, पर्यटक येणार नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांचे हाल थांबण्यासाठी तातडीने मंदिरांचे दरवाजे उघडण्याची आवश्‍यकता आहे. या विषय आस्थेसह तीर्थक्षेत्र व परिसरातील नागरिकांच्या उपजीविकेशी निगडीत आहे. केवळ नाशिकचे रामकुंड व मंदिरे तसेच त्र्यंबकेश्वर मंदिरावर अवलंबून नसुन त्र्यंबकेश्वर व नाशिक शहरातील बहुसंख्य लोकांचे जीवन व्यवहार यामुळे ठप्प झाले आहे. सामान्य जनतेचा अंत न पाहता त्वरीत मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले करावे. यासाठी त्र्यंबकेश्वर भाजपाच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले. त्यात विविध संघटनाच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. संतांनी देखील या आंदोलनात सहभागी होऊन मंदिर सुरू करण्याची मागणी केली. 

षटदर्शन आखाडा परिषदेचे महंत स्वामी सागरानंद सरस्वती महाराज, महंत गणेश महाराज, आध्यात्मिक समन्वय आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले, भाजपा प्रदेश सरचिटणीस, आमदार देवयानीताई फरांदे, जिल्हाध्यक्ष केदा आहेर, तालुकाध्यक्ष विष्णु दोबाडे, शहराध्यक्ष सुयोग वाडेकर, जिल्हा सरचिटणीस सुनील बछाव, विश्वस्त तृप्ती धारणे, श्रीकांत गायधनी, अजय दराडे, योगेश मैंड, कमलेश जोशी, श्‍याम गंगापुत्र, रविंद्र गांगुले, गोविंदराव मुळे, अनिकेत संचेती आदी या आंदोलनात सहभागी झाले. त्यांनी याबाबत निवेदन दिले. 
...
 

https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=G0xWUVK_R18AX8-xwdb&_nc_ht=scontent.fdel1-3.fna&oh=436efd3ed1703550c49e3821e3d276c7&oe=5F7042A7

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com