भाजप अस्वस्थ; गणेश गितेंसह शहाणे संजय राऊतांच्या दरबारी - BJP Disturb, Standing Chairmen meet Shivsena leader Sanjay Raut, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

भाजप अस्वस्थ; गणेश गितेंसह शहाणे संजय राऊतांच्या दरबारी

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 15 जून 2021

दोन दिवसांपूर्वी नाशिक दौऱ्यावर आलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत ज्या हॉटेलमध्ये मुक्कामी थांबून शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीचा आढावा घेत होते. त्याच वेळी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक व स्थायी समितीचे सभापती गणेश गिते व मुकेश शहाणे तेथे पोचले. हा योगायोग होता. अपघाताने त्याचवेळी पोचले, की आणखी काही, अशी चर्चा शहरात रंगली आहे.

नाशिक : दोन दिवसांपूर्वी नाशिक दौऱ्यावर आलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत ज्या (Shivsena leader Sanjay Raut visits Nashik) हॉटेलमध्ये मुक्कामी थांबून शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीचा आढावा घेत होते. (He taken review of Political Situation) त्याच वेळी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक व स्थायी समितीचे सभापती गणेश गिते व मुकेश शहाणे (BJP Chairmen Ganesh Gite, Mukesh Shahane meets Raut) तेथे पोचले. हा योगायोग होता. अपघाताने त्याचवेळी पोचले, की आणखी काही, अशी चर्चा शहरात रंगली आहे.

महापालिकेत सध्या अनेक विषयांवर भाजपच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांचे शिवसेनेशी एकमत झाल्याचे दिसते. अनेक नगरसेवक देखील परिस्थितीचा अंदाज घेत शिवसेनेशी जवळीक वाढवत आहेत. कोरोना संदर्भातील अव्यवस्थेविरोधात भाजपच्या नगरसेविका सीमा ताजने यांचे पती कन्हैय्या ताजने यांनी बिटको कोविड सेंटरमध्ये वाहन घुसवून तोडफोड केली होती. यातून त्यांनी सत्ताधारी नगरसेवक असूनही कोणीच दाद देत नाही, असा आरोप करीत भाजपला घऱचा आहेर दिला होता. त्यानंतर ते फरार झाले. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. त्यावेळी भाजपकडे नव्हे तर शिवसेनेच्या नेत्यांकडे मदतीसाठी संपर्क केला होता. त्यामुळे भाजपचे नगरसेवक खरोखर शिवसेना व अन्य पक्षाच्या वाटेवर आहेत का?. ही चर्चा खुद्द भाजपच्या नगरसेवकांतच सुरु झाली आहे. त्यात सातत्याने वाढ असल्याने भाजपची झोपमोड झाली आहे.   

काही दिवसांपासून शिवसेना व भाजपमध्ये शाब्दिक युद्ध रंगले आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना आव्हाने-प्रतिआव्हाने दिली जात आहेत. दोन्ही पक्ष व ठराविक नेत्यांमधील वाद विकोपाला गेल्याने निवडणूक कुठले टोक गाठणार, याबद्दल तर्क-वितर्क लढविले जात आहेत. त्यातच शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख व खासदार संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आले. शनिवारी रात्री उशिरा हॉटेल एक्स्प्रेस इनमध्ये ते मुक्कामी होते. रविवारी दुपारपर्यंत त्यांनी संघटनात्मक आढावा घेतला.

मुंबईकडे प्रस्थान करीत असतानाच स्थायी समितीचे सभापती गणेश गिते व नगरसेवक मुकेश शहाणे हॉटेल एक्सप्रेस इनमध्ये पोचल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. श्री. गिते, शहाणे नेमके कशासाठी आले. याबद्दल तर्क-वितर्क लढविले गेले. वादाच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांची धडकी भरली. गिते नेमके कशासाठी आले, याबाबत शेवटपर्यंत स्पष्टता झाली नाही. मात्र, राजकीय चर्चांना उधाण आले. यापूर्वीही याच हॉटेलमध्ये भाजपचे नगरसेवक दिनकर पाटील यांनी खासदार राऊत यांची भेट घेतली होती. त्या वेळीही अनेक चर्चा रंगल्या होत्या.
...
हेही वाचा...

नाशिककर म्हणाले, राज ठाकरेंचा वाढदिवस रोज साजरा होवो

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख