भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीत 132 सदस्य, त्यात 32 महिला !  - BJP District working comitty of 132 members | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीत 132 सदस्य, त्यात 32 महिला ! 

संपत देवगिरे
गुरुवार, 27 ऑगस्ट 2020

भारतीय जनता पक्षाच्या नाशिक जिल्हा कार्यकारिणीची घोषणा झाली आहे. जिल्हा कार्यकारिणीत तब्बल 132 जणांचा समावेष आहे. यामध्ये 32 महिला आहेत. 
 

नाशिक : भारतीय जनता पक्षाच्या नाशिक जिल्हा कार्यकारिणीची घोषणा झाली आहे. जिल्हा कार्यकारिणीत तब्बल 132 जणांचा समावेष आहे. यामध्ये 32 महिला आहेत. 
अन्य कार्यकारिणींप्रमाणेच जिल्ह्यालाही जम्बो कार्यकारिणी लाभली आहे. विशेष म्हणजे या कार्यकारिणीत 32 विद्यमान व माजी आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, नेत्यांचा समावेष आहे. या सर्व हेवीवेट नेत्यांचे ओझे सांभाळत ही कार्यकराणी कसे काम करते हे पाहणे उत्सुकतेचा विषय आहे. 

भाजपकडून महाराष्ट्र प्रदेश राज्यपातळीवर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यानंतर गेले दोन दिवस विविध प्रलंबीत असेल्या आघाडी, व जिल्हा कार्यकारिणीचे प्रस्तावही मंजूर करण्यात आले आहेत. त्यात नाशिक जिल्हा कार्यकारिणीला मुहूर्त लागला आहे. जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी बुधवारी त्याची घोषणा केली आहे. या कार्यकारिणीत तीन सरचिटणीस, नऊ उपाध्यक्ष, नऊ चिटणीस, सत्तर कार्यकारिणी सदस्य, असतरा कायम निमंत्रीत तर 15 निमंत्रीत अशी 132 पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी जाहीर केली आहे. 

या कार्यकारिणीत सरचिटणीस : प्रा. सुनिल बच्छाव, नंदकुमार खैरनार, भूषण कासलीवाल, उपाध्यक्ष : बंडूनाना भाबड, लक्ष्मण निकम, नितीन पांडे, अजय दराडे, रमेश थोरात, डॉ. नितीन गांगुर्डे, मनिषा बोडके, योगिता आवारे, सारिका डेर्ले. खजिनदार : प्रकाश दायमा, चिटणीस : सतिश मोरे, शरद कासार, दिनेश कोळेकर, राम बडोदे, स्वप्निल शिंदे, सीमा विलास झोले, तृप्ती पंकज धारणे, सविता कोठूरकर, डॉ. स्वाती देवरे. शहर कार्यकारिणीपाठोपाठ जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून नियुक्ती करण्यात आली. कार्यकारिणीमध्ये नवीन व तरुण चेहऱ्यांना संधी देताना प्रत्येक तालुक्‍याला स्थान देण्यात आले आहे. कार्यकारिणीत महिलांची संख्या 32 अर्थात तीस टक्‍क्‍यांपर्यंत आहे. सुनील बच्छाव, नंदकुमार खैरनार व चांदवडचे माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांच्याकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी देण्यात आली. 

असे आहेत मोर्चाचे अध्यक्ष 
युवा मोर्चा : सचिन दराडे,  
महिला मोर्चा : सुवर्णा जगताप, 
अ. जा. मोर्चा  : आण्णासाहेब डोंगरे, 
किसान मोर्चा : पंकज शेवाळे, 
अ. ज. मोर्चा : नारायण (एन. डी.) गावित, 
अल्पसंख्याक मोर्चा : रफिक शेख, 
ओबीसी मोर्चा : सुखदेव चौरे.

 
... 

https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख