रेशनिंग भ्रष्टाचार रोखण्यासाठी दक्षता समित्यांचे पुर्नगठण करा !

सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पारदर्शकतेसाठी सुरु करण्यात आलेली `एसएमएस` प्रणाली सध्या बंद झाली आहे. त्यामुळे दक्षता समित्यांच्या सदस्यांना धान्याचे वितरण व अन्य माहिती उपलब्ध होत नाही. यासंदर्भात सातत्याने तक्रारी येत आहेत.
रेशनिंग भ्रष्टाचार रोखण्यासाठी दक्षता समित्यांचे पुर्नगठण करा !

नाशिक : सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पारदर्शकतेसाठी सुरु करण्यात आलेली `एसएमएस` प्रणाली सध्या बंद झाली आहे. त्यामुळे दक्षता समित्यांच्या सदस्यांना धान्याचे वितरण व अन्य माहिती उपलब्ध होत नाही. यासंदर्भात सातत्याने तक्रारी येत आहेत. त्यामुळे या व्यवस्थेतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी `एसएमएस` प्रणाली  सुरु  करावी. दक्षता समित्यांचे पुनर्गठण करावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. 

यासंदर्भात सौ. वाघ यांनी राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना निवेदन पाठविले आहे. त्या म्हणाल्या, सार्वजनित वितरण व्यवस्थेतील कामकाज अधिक पारदर्शी होण्याची गरज आहे. त्यासाठी कार्यरत असलेल्या दक्षता समित्यांचे पुर्नगठन करावी. पुर्नगठन करतांना त्यात त्यात गावातील तसेच प्रभागातील नियमित लाभार्थ्यांना समाविष्ट करावे. याद्वारे त्यांचे बळकटीकरण होईल. 

रेशनिंग व्यवस्थेतील धान्य, शिधावस्तुंची गळती, भ्रष्टाचार, कार्डधारकांची फसवणूक, नियमांविषयी, अधिकारांविषयी लोकांमध्ये असणारे अज्ञान, संदिग्धता यांसारख्या त्रुटी दूर करण्यासाठी तसेच पारदर्शक व्यवस्थेसाठी आमच्या मागण्यांचा गांभिर्याने विचार करावा. रेशन व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा २०१३ नुसार स्थानिक पातळीवर रेशन दक्षता समितीच्या सदस्यांना दुकानात येणारे धान्य किती आणि ते दुकानदाराकडे कधी आले याची माहिती `एसएमएस` द्वारे मिळत होती. दुकानात धान्य आल्यावर ते उतरवून घेताना स्थानिक प्रशासक आणि रेशन दक्षता समिती यांच्या देखरेखी खालीच धान्य दुकानात उतरवले जात असे. सध्या या दोन्ही प्रणाली बंद आहेत. त्याचप्रमाणे राज्यभरातील रेशन दक्षता समितीचे ही पुनर्गठन करण्यात आलेले नाही. या दोन्ही प्रणाली सुधारित आणि नव्या माध्यमात पुन्हा सुरु व्हाव्यात अशी आमची मागणी आहे.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील भ्रष्ट्राचाराला आळा घालण्यासाठी सर्व कार्डधारकांना त्यांच्या फोनवर त्यांच्या दुकानात धान्य आल्याची माहिती पाठवली जावी. राज्यभरातील रेशन दक्षता समित्यांचे पुनर्गठण करून त्यांचे बळकटीकरण करावे. तक्रारमुक्त आणि पारदर्शक रेशन व्यवस्थेचे ध्येय यातून साध्य होऊ शकेल.
...
 

https://scontent-sin6-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=IJjfSVQdRK0AX9iJte7&_nc_ht=scontent-sin6-2.xx&oh=51025ed308444a97a958cda27edc4e55&oe=5F8FE6A7

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com