भाजप म्हणते, कोरोनामुळे वीज बिलात निम्मी सुट द्या ! - BJP Deemanded 50% cut in electricity bills | Politics Marathi News - Sarkarnama

भाजप म्हणते, कोरोनामुळे वीज बिलात निम्मी सुट द्या !

संपत देवगिरे
सोमवार, 3 ऑगस्ट 2020

वीज वितरण कंपनीने दिलेल्या वाढीव बिलांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने शहरात आंदोलन सुरु केले आहे. यासंदर्भात आज त्यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिका-यांना वीज बिलाची राखी बांधून प्रतिकात्मक निषेध केला.

नाशिक : वीज वितरण कंपनीने दिलेल्या वाढीव बिलांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने शहरात आंदोलन सुरु केले आहे. यासंदर्भात आज त्यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिका-यांना वीज बिलाची राखी बांधून प्रतिकात्मक निषेध केला. तातडीने कार्यवाही करुन कोरोनामुळे वीज बिलांत पन्नास टक्के सवलत द्यावी अशी मागणी करण्यात आली. 

यापूर्वी भाजपने वीज वितरण कंपनीला निवेदन दिले होते. त्यासंदर्भात भाजपला निवेदनाविषयी उत्तर पाठविण्यात आले  आहे. मात्र या पत्रात मीटर रिडींगप्रमाणे बीलाची वीजेची आकारणी व्हावी, मीटर रिडींग करतांना ग्राहकांच्या समक्ष रिडींग घेण्यात यावे, जुन्या दरानेच आकारणी करावी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पन्नास टक्के देण्यात यावी आदी मागण्यांचा उल्लेख नाही, असा आक्षेप भाजपने घेतला आहे. या मागण्यांचा यावेळी पुनरुच्चार करण्यात आला. दरवाढीचा निर्णय मागे घ्यावे व मागणीसंदर्भात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. 

दरम्यान वाढीव वीज बिलांच्या विरोधात भाजपतर्फे शहरात विविध भागात पदयात्रा काढली जात आहे. या पदयात्रेत आज राज्य शासनाचा निषेध म्हणून बिलांची होळी करण्यात आली. कोरोनाच्या या संकटात लाँकडाऊनच्या काळात अनेक लोकांचे नोकरी, काम, धंदे बंद असतांना, गेली तीन महिने कुठल्याही प्रकारचे उत्पादन नसतांना राज्य सरकारने दरवाढ केली. शासनाने जनतेला वीज बिलात सुट देऊन दिलासा दिला पाहिजे होता. तसे न करता दुप्पट-तिप्पट बिल देऊन सामान्य जनतेची फसवणूक केली आहे. या विरोधात आघाडी सरकारचा निषेध म्हणून सिडकोतील पवननगर येथुन पदयात्रा काढण्यात आली. त्यानंतर सिटी सेंटर माँल येथे वाढीव वीज बिलाची होळी करण्यात आली.

यावेळी महापौर सतिश कुलकर्णी, भाजपा शहराध्यक्ष गिरीश पालवे, सभागृह नेते सतिष सोनवणे, गटनेते जगदीश पाटील, उद्योग आघाडी प्रदेश अध्यक्ष प्रदिप पेशकार, मंडल अध्यक्ष शिवाजी बरके, अविनाश पाटील, जगन पाटील, बाळासाहेब पाटील, नगरसेविका छाया देवांग, नगरसेवक मुकेश शहाणे, श्याम बडोदे, सचिन कुलकर्णी, अमित घुगे, रवी पाटील, प्रकाश चकोर, गणेश ठाकूर आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी सहभागी झाले होते. 
...
 

https://scontent-frt3-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_4607380974576...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख