badgujar-Kulkarni
badgujar-Kulkarni

वाद उड्डाणपूलाचा...शिवसेनेचा नेता ठेकेदारांची रिंग करतो?

महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सर्वपक्षीय नगरसेवकांना विकासकामांसाठी निधीची आवशक्यता आहे. त्यामुळे शहरातील दोन्ही उड्डाणपूल तातडीने रद्द करावेत. या पुलांसाठी शिवसेनेच्या एका बड्या नेत्याने रिंग केल्याचा गंभिर आरोप भाजपच्या नगरसेवकांनी केला. त्यासंदर्भात येत्या काही दिवसांत कागदपत्रांसह या प्रकरणाचा पर्दाफाश करण्याचा दावा त्यांनी केला आहे.

नाशिक : महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सर्वपक्षीय नगरसेवकांना विकासकामांसाठी निधीची आवशक्यता आहे. (corporator need funds for devolopment) त्यामुळे शहरातील दोन्ही उड्डाणपूल तातडीने रद्द करावेत. (Cancel both flyover) या पुलांसाठी शिवसेनेच्या एका बड्या नेत्याने रिंग केल्याचा गंभिर आरोप भाजपच्या नगरसेवकांनी केला. त्यासंदर्भात येत्या काही दिवसांत कागदपत्रांसह (BJp will uncurtain on Scam) या प्रकरणाचा पर्दाफाश करण्याचा दावा त्यांनी केला आहे.

सभागृहनेते कमलेश बोडके, शहराध्यक्ष गिरीश पालवे, स्थायी समिती सभापती गणेश गिते, गटनेते अरुण पवार, मुकेश शहाणे, इंदूबाई नागरे, पूनम सोनवणे, पूनम धनगर, माधुरी बोलकर, छाया देवांग आदींनी निवेदन दिले. 

पुढील सहा महिन्यांमध्ये महापालिकेच्या निवडणुका होणार असून, दीड वर्षात कोरोनाची परिस्थिती बघता शहराचा समतोल विकास करण्यामध्ये, तसेच मूलभूत सुविधा पुरवण्यामध्ये अनेक बंधने आली आहेत. सर्वपक्षीय नगरसेवकांना आपल्या प्रभागांमध्ये जास्तीत जास्त मूलभूत कामे करण्याची गरज वाटत असून, त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. हा प्रश्‍न एकट्या भाजपचा नसून सर्वपक्षीय नगरसेवकांकडून निधीची मागणी केली जात आहे. मध्यंतरी कोरोना उपाययोजनांसाठी जास्तीत जास्त निधीदेखील सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठपुरावा केल्यामुळे दिला गेला. आता संपूर्ण शहराचा समतोल विकास होईल, अशा पद्धतीने नियोजन करून प्रभाग विकास निधीमध्ये वाढ करणे आवश्यक आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

उड्डाणपूलाचा हेतू शुद्ध नाही
शहरात २५० कोटींचे दोन उड्डाणपूल प्रस्तावित आहेत. पूल होणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र, या उड्डाणपुलासाठी आग्रह धरण्याचा हेतू शुद्ध नसल्यामुळे किंबहुना त्यात आर्थिक हित आहे. पूल तत्काळ रद्द करणे गरजेचे आहे. याप्रकरणी नेमके गौडबंगाल काय आहे, हे शोधण्याचा प्रयत्न आहे. ही संपूर्ण प्रक्रिया शिवसेनेच्या एका बड्या नेत्याने रिंग करून हाताळल्याचा संशय असून, त्यास पुष्टी देणारी काही कागदपत्रे हातात लागली आहेत. ज्यात सकृतदर्शनी ठेकेदार आणि शिवसेनेच्या संबंधित पदाधिकाऱ्यांचे हितसंबंध दिसत आहेत. पुढील दोन दिवसांमध्ये या संदर्भातील सर्व कागदपत्रे, तसेच पुरावे पडताळून आपल्याकडे सादर केले जातील. त्यात तथ्य असेल तर तत्काळ दोन्ही उड्डाणपुलांची कामे रद्द करावी, अशी मागणी केली आहे. तसेच यात गुंतलेल्यांवर कारवाईसाठी भाजप आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला.
...
हेही वाचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com