महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजप स्वबळावर - BJP contest ZP, corporation election alone, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजप स्वबळावर

सरकारनामा ब्युरो
रविवार, 18 जुलै 2021

पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपचे काम मतदारांपर्यंत पोचवून मतदारांना आपल्याकडे वळविण्याचे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना केले. सर्व जागा भाजपला लढायच्या आहे. 

नाशिक : पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपचे काम मतदारांपर्यंत पोचून (Go to voters to convert them as BJP voters) मतदारांना आपल्याकडे वळविण्याचे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (State president Chandrakant Patil) यांनी पदाधिकाऱ्यांना केले. सर्व जागा भाजपला लढायच्या आहे. ( we will contest all wards alone) त्याचबरोबर नाशिकमध्ये कोणाशीही युती होणार नसल्याचे स्पष्ट करताना स्वबळासाठी सज्ज होण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आले आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने संघटनात्मक बांधणीवर त्यांनी भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून ग्रामीण व शहरी भागातील पदाधिकाऱ्यांबरोबर त्यांनी वसंत स्मृती कार्यालयात बैठका घेतल्या. 

महापालिकेत भाजपची पूर्ण बहुमताने सत्ता असली तरी गेल्या काही वर्षांमध्ये संघटनेतील वाद उफाळून आले आहे. आमदारांचे एकमेकांमध्ये पटत नाही, आजी-माजी आमदारांमध्ये गटबाजी उफाळून आली आहे, नगरसेवकांमध्ये एक वाक्यता नाही, या पार्श्‍वभूमीवर त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना कानमंत्र दिला. भाजपमध्ये व्यक्ती मोठा नाही तर पक्ष मोठा आहे. जो पदाधिकारी किंवा कार्यकर्ता पक्ष कार्यात स्वतःला वाहून घेईल, पक्षासाठी वेळ देतील, त्यांनाच उमेदवारी व महत्त्वाचे पदे मिळतील. महापालिका निवडणुकीत भाजप कोणाशीही युती होणार नाही. सर्व जागा भाजपला लढायचे आहे. त्यामुळे आतापासूनच कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी तयारीला लागावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. 

संघटनेत बदलाला नकार 
महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना, मनसे व अन्य पक्षांमध्ये आक्रमक चेहरा असलेला शहराध्यक्ष आहे. त्यामुळे निवडणुकीत या पक्षांच्या विरोधाला सामोरे जायचे असेल तर आक्रमक चेहरा असलेला शहराध्यक्ष हवा. त्यासाठी विद्यमान शहराध्यक्ष गिरीश पालवे यांना बदलून त्यांच्या जागी अन्य व्यक्तींची नियुक्ती करावी. असा सूर भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्याबद्दल बोलताना पाटील यांनी शहराध्यक्ष पद बदलण्यास नकार देताना नगरसेवकांमध्ये नाराजी असली तरी मतभेद मिटविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. 
...
हेही वाचा...

बच्चू कडू म्हणतात, राजकारणातील वाद कुठे खरे असतात?

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख