भाजप म्हणते, आम्ही शहरासाठी मिळवल्या दहा हजार लस - BJP claim, our agitation given 10k vaccine doses, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

भाजप म्हणते, आम्ही शहरासाठी मिळवल्या दहा हजार लस

संपत देवगिरे
शुक्रवार, 14 मे 2021

मच्या आंदोलनास यश आले आहे. केंद्र सरकरच्या कोट्यातून नाशिकसाठी दहा हजार लस उपलब्ध झाल्या आहेत, अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी दिली.

नाशिक : आमच्या आंदोलनास यश आले आहे. (BJP Agitation success) केंद्र सरकरच्या कोट्यातून नाशिकसाठी दहा हजार लस उपलब्ध (Nashik got 10k Doses from centre`s Quota) झाल्या आहेत, अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे (City chief Girish Palve) यांनी दिली.

श्री. पालवे आणि प्रदेश सरचिटणीस आमदार देवयानी फरांदे यांच्या   नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्याकडे केली होती.  मुंबई, पुण्याच्या तुलनेत नाशिककराना लसीचा पुरवठा कमी होत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते.

श्री. पालवे म्हणाले, कोरोनावर लस हा एकमेव प्रतिबंधात्मक उपचार आहे. महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध करून दिली असताना शहर व जिल्ह्यावर मात्र अन्याय करण्यात येत होता. महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या १ कोटी ८५ लाख लसींपैकी नाशिक जिल्ह्याला फक्त ८.३८ लाख लसी उपलब्ध करून देण्यात आल्या.  पुणे येथे हे प्रमाण २५ लाख तर मुंबई येथे २७.७० लाख आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून नाशिक जिल्ह्यावर वारंवार होत आहे. असे जिल्हाधिकारी नाशिक यांच्या लक्षात आणून दिले. त्याचा परिणाम त्वरित नाशिककरांसाठी दहा हजार लसीचे वितरण करण्यात आले.  लसीकरण चा कार्यक्रम पूर्ववत सुरू झाल्याची माहिती गिरीश पालवे यांनी दिली  

दरम्यान शहरात १२ ते २२ मे या कालावधीत शासनाने कडक लॉकडाऊनची  घोषणा केली असता शहरात राज्य सरकारकडून कोणतीही पूर्व तयारी न करता हे कडक लॉकडाऊन सुरू करण्यात आले.  त्यामुळे नाशिककरांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार असल्याची चर्चाही या वेळी झाली.

यावेळी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी देखील भाजपा शिष्टमंडळाने केलेल्या मागणीची दखल घेऊन नाशिक जिल्ह्यासाठी अतिरिक्त साठा उपलब्ध व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करून त्यांना नाशिक जिल्ह्यातील परिस्थितीबाबत अवगत करून देतांना ३० हजार नागरिक दुसरा डोससाठी प्रलंबित असून वेळेत उपलब्ध न झाल्यास त्याचा परिणाम तीस हजार नागरिकांना पुन्हा लस घेणे भाग पडेल. लस वाटप करतांना पुढच्या टप्प्यात हा अन्या दूर केला जाईल असे आश्वासन अर्चना पाटील यांनी दिले, असा दावा पालवे यांनी केला. 

यावेळी आमदार सिमाताई हिरे, आमदार राहुल ढिकले, महापौर सतीश कुलकर्णी, सभागृह नेते सतीश बापू सोनवणे, गटनेते जगदीश पाटील, प्रशांत पेशकार उपस्थित होते.
...
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख