शरद पवारांच्या कोरोनाविषयक बैठकीवर भाजप आमदारांचा बहिष्कार! - bjp bycott sharad Pawar nashik corona meeting | Politics Marathi News - Sarkarnama

शरद पवारांच्या कोरोनाविषयक बैठकीवर भाजप आमदारांचा बहिष्कार!

संपत देवगिरे
शुक्रवार, 24 जुलै 2020

शहरातील कोरोनाचा संसर्ग तीव्र स्वरुप धारण करीत आहे. त्यावरील उपाययोजनांसाठी  ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीवर भारतीय जनता पक्षाने बहिष्कार टाकला.  

नाशिक : शहरातील कोरोनाचा संसर्ग तीव्र स्वरुप धारण करीत आहे. त्यावरील उपाययोजनांसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये बैठक झाली. मात्र भारतीय जनता पक्षाने श्री. पवार यांच्या बैठकीवर बहिष्कार टाकला.

राज्यातील कोरोना नियंत्रणासाठी राज्य शासनासह विविध संस्था, संघटना, लोकप्रतिनिधी पुढे येऊन मदत करीत आहे. सध्या नाशिक शहरातील कोरोनाचा वाढता संसर्ग अतिशय चिंतेचा विषय आहे. त्यामुळे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांसह शरद पवार यांनी नाशिकला खास आढावा बैठक घेतला. त्याला पालकमंत्री छगन भुजबळ, कृषीमंत्री दादा भुसे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांसह विभागातील सर्व प्रमुख अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. मात्र या बैठकीची चर्चा झाली ती भाजपच्या आमदारांनी बैठकीवर टाकलेल्या बहिष्काराने. 

यासंदर्भात भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष गिरीश पालवे म्हणाले, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकांना शासकीय अधिकारी उपस्थित रहात नाहीत. यापुर्वी झालेल्या बैठकांना भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधींना निमंत्रीत केले नाही. शहरातील उपाययोजनांविषयी प्रशासन आमचे एैकत नाही. त्यामुळे शरद पवार यांच्या बैठकीवर आम्ही बहिष्कार टाकत आहोत.
....   

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख