धुळे शहराच्या उपमहापौरपदी भाजपचे भगवान गवळी  - BJP Bhagwan Gavali Became Deputy mayor of Dhule, Nashik POlitics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

धुळे शहराच्या उपमहापौरपदी भाजपचे भगवान गवळी 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 28 जून 2021

धुळे महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी भाजपचे भगवान गवळी यांची निवड झाली. यामध्ये भारतीय जनता पक्षाचे बेरजेचे राजकारण पुन्हा एकदा यशस्वी झाले आहे. 

धुळे : धुळे महानगरपालिकेच्या (Dhule Munciple corporation) उपमहापौरपदी भाजपचे भगवान गवळी Bhagwan Gavali elected as Dy. Mayor) यांची निवड झाली. यामध्ये भारतीय जनता पक्षाचे बेरजेचे राजकारण पुन्हा एकदा यशस्वी झाले आहे. 

नगरसेवकांच्या संख्येच्या बळावर भाजपकडे धुळे महानगर पालिकेची सत्ता होती. आज देखील उपमहापौरपदी भाजपचे उमेदवार गवळी विजयी झाले. महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकला आहे. जिल्हाधिकारी संजय यादव हे पीठासीन अधिकारी होते. 

संख्याबळ बघता व भाजपने एकमेव उमेदवाराचा अर्ज दाखल केल्यामुळे भाजपतर्फे उपमहापौरपदी भगवान गवळी यांचा विजय जवळपास निश्‍चित मानला जात होता. अपेक्षेप्रमाणे आज उपमहापौरपदाच्या निवडणुकीमध्ये भाजपचे भगवान गवळी यांची निवड झाल्याने यावरदेखील शिक्कामोर्तब झाले आहे.

धुळे महापालिकेत आज झालेल्या निवडणुकीत भगवान गवळी (भाजप) यांना 50, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे खान सदीम हुसेन रहमतुल्लाह यांना 19 तर `एमआयएम`च्या शेख मेहरुन्निसा झाकीर यांना 4 मते मिळाली. 

धुळे महानगरपालिकेचे महापौर चंद्रकांत सोनार आणि मावळत्या उपमहापौर कल्याणी अंपळकर यांच्या अडीच वर्षांचा कार्यकाळ 30 जूनला संपुष्टात येत आहे. महापौरपदाच्या आरक्षणप्रश्‍नी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल असल्याने त्यावर 12 जुलैला कामकाज होणार आहे. त्यामुळे  महापौरपद अंतिम निकाल लागेपर्यंत रिक्त राहण्याची शक्यता असेल. मात्र, उपमहापौरपदाची निवडप्रक्रिया आज कोरोनाच्या सावटाखाली ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. भाजपचे उमेदवार भगवान गवळी यांची उपमहापौरपदी वर्णी लागली आहे.

महापालिकेतील 74 नगरसेवकांपैकी भाजपाकडे 50 नगरसेवक आहेत.  शिवसेना 2, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडी 14, एम आय एम 2, समाजवादी पार्टी 2, बसपा 1, अपक्ष 2, लोकसंग्राम पक्षाचा 1 नगरसेवक आहे. लोकसंग्रामच्या एकमेव नगरसेविका हेमा गोटे यांनी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे.
....

हेही वाचा...

केंद्रातील भाजप सरकारचा सहकार संपवण्याचा डाव

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख