नाशिक : भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश अध्यक्ष हाजी मो. एजाज देशमुख व प्रभारी नागनाथ (अण्णा) निडवदे यांनी घोषित केली. यामध्ये पहिल्यांदाच सात धर्मांसाठी सात प्रमुखांची नियुक्ती झाली आहे. पार्टी वीथ डिफरन्स असलेल्या भाजपने खरोखरच आजवर नसेलली प्रथा सुरु करीत, प्रत्येक धर्मासाठी स्वतंत्र प्रमुख नेमल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
भाजप अल्पसंख्यांक मोर्चाच्या या कार्यकारिणीत 8 उपाध्यक्ष, 2 सरचिटणीस, 10 चिटणीस, 1 कोषाध्यक्ष व अकरा अन्य "प्रमुख' असे पद असलेले पदाधिकारी आहेत. या पदाधिकाऱ्यांची घोषणा आज झाली. कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी त्याची बातमी प्रसिद्धीस दिली आहे. या पत्रकात पहिल्यांदाच धर्मनिहाय प्रमुख नियुक्त केले आहेत. यामध्ये जैन प्रमुख- संदीप भंडारी (पुणे), ख्रिश्चन प्रमुख- जयराम डिसूझा (मिरा-भायंदर), शीख प्रमुख- सुरेंद्रसिंग सूरी (मुंबई), ज्यू प्रमुख- ससुन फणसापूरकर (मुंबई), सिया प्रमुख- सय्यद मुस्तफा (औरंगाबाद), बोहरी समाज प्रमुख- जोएब बुटावाला (मुंबई), नवबौद्ध प्रमुख- विकास गुजर पगारे (नाशिक), महिला प्रमुख- सुल्ताना समीर खान (मीरा-भाईंदर), शिक्षक प्रमुख- डॉ. प्रा. शेख शाकेर राजा (औरंगाबाद), विधी प्रमुख- ऍड सिकंदर अली (औरंगाबाद).
पदाधिकाऱ्यांच्या यादीमध्ये धर्मनिहाय प्रमुख नियुक्त करण्यात आले आहेत. आजवर राजकीय पक्ष मुख्य कार्यकारीणीत सर्वांनांच स्थान देने शक्य नसल्याने महिला, युवक, व्यवसाय, अल्रसंख्यांक आदी आघाड्यांची स्वतंत्र कार्यकारीणी नियुक्त करीत असतो. यामध्ये विविध आघाडी, त्याचे पदाधिकारी नियुक्त करताना जात, धर्म यानुसार नियुक्त्या करमे नवे नाही. मात्र त्याची जाहीरपणे चर्चा किंवा धर्माच्या उल्लेखासह नियुक्ती झाल्याचे उदाहरण अपवादानेच असेल. पार्टी वीथ डिफरन्स, जगातील सर्वात मोठा पक्ष ही बिरुदावली मिरवणाऱ्या भाजपने ही नवी प्रथा मात्र सुुर केल्याचे दिसते. धर्म अथवा जात निहाय त्यांचे प्रमुख अशी नियुक्ती झाल्याचे एैकीवात नाही. देशात प्रत्येक राजकीय पक्षाची घटना धर्मनिरपेक्ष तत्वानुसार असल्याचे घोषीत करण्याची पद्धत आहे. त्यामुळे भाजपकडून धर्म निहाय प्रमुख नियुक्त केल्याने तो चर्चेचा विषय झाला आहे. त्यावर अन्य राजकीय पक्षांकडून टिकेचीही शक्यता आहे.
...
यामुळे नेमले धर्मनिहाय प्रमुख
कार्यकारिणीमध्ये पदाधिकारी संख्येस मर्यादा असते. त्यामुळे अल्पसंख्यांक गणले जाणारे सात धर्म आहेत. त्या प्रत्येकासाठी एक प्रमुख नियुक्त केला आहे. शीया व पारशी समाजाला देखील प्रतिनिधीत्व देण्याची इच्छा आहे. आमचा पक्ष सर्वांना सामावून घेणारा आहे. त्यामुळे पहिल्यांदाच असा राजकीय प्रयोग केला आहे.
- हाजी मो. एजाज देशमुख, अध्यक्ष, अल्पसंख्यांक आघाडी.
https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

