"राष्ट्रवादी'चा शॉक; भाजप, मनसे कार्यकर्त्यांचा "राष्ट्रवादी'त प्रवेश  - BJP and MNS workers took NCP membership | Politics Marathi News - Sarkarnama

"राष्ट्रवादी'चा शॉक; भाजप, मनसे कार्यकर्त्यांचा "राष्ट्रवादी'त प्रवेश 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 26 सप्टेंबर 2020

भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विविध कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. आगामी महापालिका निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर या प्रवेशाला महत्व दिले जात आहे.

नाशिक : भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विविध कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. आगामी महापालिका निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर या प्रवेशाला महत्व दिले जात आहे. यानिनित्तामे महापालिकेत एकहाती सत्ता असलेल्या भाजप आणि पक्ष विस्तारासाठी आक्रमक भूमिका घेतलेल्या "मनसे' दोघांनाही राजकीय शॉक मानला जातो. 

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसकडून सुरु असलेले सामाजिक उपक्रम आणि नागरिकांचे सोडवीत हाती घेऊन केलेल्या कामामुळे युवकांत या पक्षाबद्दल क्रेझ वाढत आहे. त्यामुळे सर्व पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडे आकर्षित होत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांची लोकप्रियता यातुन पक्षविस्तारासाठी प्रयत्न केले जात आहेत. जनतेच्या हिताकरिता घेत असलेल्या निर्णयामुळे युवक राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडे आकर्षित होत आहेत. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस विविध कामांच्या माध्यमातून नाशिककरांचे प्रश्न सोडवीत असून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी लढत आहे. त्याअनुषंगाने मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते प्रवेश करत आहेत. प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमुळे "राष्ट्रवादी'ला बळकटी येईल, असे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी सांगितले. 

यावेळी अथर्व खांदवे, वैभव शिरसाठ, सागर शेजवळ, दीपक कुलकर्णी, अभिमन्य गुडघे-पाटील, ओमकार गोंद्रे, मयूर डोंगरे, गणेश गरगटे, प्रणव पानकर, संदीप दरेकर, शाहूराजे गुडघे,नितीन ओगदे, अमोल पाटील, वेदांत काळे, निरज पाटील, तुळशीदास गुडघे, सिद्धार्थ सांगळे, रोहित सूर्यवंशी, प्रशांत गाडेकर, उत्कर्ष डोके, उमेश स्नेहभक्त, बलराम चव्हाण, सागर वाघ, विवेक तुपे, स्वप्निल सांगळे, तेजस काके, अतुल अर्जुन, स्वामी मोरे, प्रवीण कापुरे, शुभम खैरनार, गौरव भडांगे, नवनाथ सूर्यवंशी, शुभम शिरसाठ, अक्षय श्रीखंडे, हेमंत मोरे, आदित्य शिंदे, विशाल भडांगे, साहिल तुपे, अजय भसरे, रोहन घोडके, निनाद भडांगे, बाबू मठ्ठी, स्वप्निल मुठाळ, विकी गायकवाड आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. 

यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहर उपाध्यक्ष किरण पानकर, निलेश सानप, जय कोतवाल, मुकेश शेवाळे, सागर बेदरकर, राहुल कमानकर, करण आरोटे, रामेश्वर साबळे आदी उपस्थित होते. 
...  

https://scontent-sin6-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_4607380974576...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख