विकासकामांत भाजपचा कायमच खोडा

नगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शहरात होत असलेल्या विकासकामांना अडथळे आणण्याचे काम भाजपचे पदाधिकारी करीत आहेत. सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर आणि पालकमंत्र्यांवर बेछूट आरोप करून जनतेची दिशाभूल करता येणार नाही. शहरातील नागरिक जाणकार आहेत. त्यामुळे विकासकामे कोण करीत आहे. याची जनतेला जाणीव आहे, असे मत पालिकेतील शिवसेनेचे गटनेते विनय भावे यांनी व्यक्त केले.
Shivsena jal
Shivsena jal

धरणगाव : नगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शहरात होत असलेल्या विकासकामांना अडथळे आणण्याचे (BJP leaders always create hurdle in Devolopment) काम भाजपचे पदाधिकारी करीत आहेत. सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर आणि पालकमंत्र्यांवर बेछूट आरोप (Baseless aligations) करून जनतेची दिशाभूल करता येणार नाही. शहरातील नागरिक जाणकार आहेत. त्यामुळे विकासकामे कोण करीत आहे. याची जनतेला जाणीव आहे, असे मत पालिकेतील शिवसेनेचे गटनेते विनय भावे (Shivsena leader Vinay Bhave) यांनी व्यक्त केले.

शहरातील पालिका सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दोन दिवसांपूर्वी धरणगाव पाणीपुरवठा प्रश्‍नी शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना काळे झेंडे दाखवले होते आणि सेनेच्या कामकाजाबाबत पत्रकार परिषद घेतली होती. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या वेळी श्री. भावे म्हणाले, शहराला पाणीपुरवठा करण्यामध्ये तांत्रिक अडचणी आहेत. यासाठी पालकमंत्र्यांना दोषी धरणे योग्य नाही.

शहरातील पाणी वितरण वहिनी जोपर्यंत बदलली जात नाही, तोपर्यंत शहरातील पाणीपुरवठ्यावर कायमस्वरूपी तोडगा निघणार नाही. यासाठी पालिकेमार्फत प्रयत्न सुरू असून, लवकरच शहरातील वितरण वाहिनी बदलली जाणार आहे. भाजप पदाधिकाऱ्यांनी केलेले शिवसेना पदाधिकाऱ्यांवरचे वैयक्तिक आरोप त्यांनी फेटाळून लावले. पालकमंत्र्यांचे पुत्र प्रतापराव पाटील यांच्या नावे शहरात कोणती प्रॉपर्टी नाही, उगाच जनतेची दिशाभूल करू नये, आपल्या प्रभागातील विकासकामांवर नगरसेवक लक्ष ठेवून काम करत असेल तर नगरसेवक कॉन्ट्रॅक्टर झाला, असे नाही त्यांच्या प्रभागात दर्जेदार काम करून घेणे ही त्यांची जबाबदारी असते. भाजप पदाधिकाऱ्यांचे सामाजिक योगदान किती आहे, हे देखील जनतेला माहित आहे.

नगराध्यक्ष नीलेश चौधरी यांनी आपण टक्केवारी घेतली असल्याचे सिद्ध केल्यास मी राजीनामा देईल, असे आव्हान देत आपण महात्मा गांधी उद्यान पुनर्निर्माण कार्यक्रमाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला वडिलांची प्रकृती बरी नसल्याने अनुपस्थित होतो, असे स्पष्ट केले. शहरातील पाणीपुरवठ्याबाबत आता नव्याने दोन पंप पालकमंत्र्यांच्या सहकाऱ्यांनी मिळालेले आहेत. लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे स्पष्ट केले. गेल्या गेल्यावेळी भाजप आमच्यासोबत पालिकेत सत्तेत होते. पाणीपुरवठा सभापती भाजपचे असताना किती दिवसाआड शहराला पाणीपुरवठा व्हायचा, याचे आत्मपरीक्षण भाजपने केले पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला.

पत्रकार परिषदेला नगराध्यक्ष नीलेश चौधरी, माजी नगराध्यक्ष पी. एम. पाटील, सेनेचे शहरप्रमुख राजेंद्र महाजन, राजेंद्र ठाकरे, धीरेंद्र पूर्भे, शरद माळी, योगेश वाघ, वासुदेव चौधरी, विजय महाजन, विलास महाजन यांच्यासह सेनेचे नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते.
---
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com