भाजपला जाग आली... इंजेक्शन न देणाऱ्या कंपनीला नोटीस?

आगाऊ देयकांची रक्कम अदा करूनही उत्पादक कंपनीने अपुरा पुरवठा केल्याने नोटीस बजावण्यात यावी, असे आदेश स्थायी समिती सभापती गणेश गिते यांनी दिले.
Ganesh Gite
Ganesh Gite

नाशिक : कोरोना संसर्गाचा वेग वाढत असताना रुग्णांना रेमडेसिव्हिर इंजेक्शनची गरज असताना महापालिकेने मागणी नोंदवूनही गेट वेल फार्माने पुरवठा न करता (Gate well Pharma sell injection open market, Not supplied to NMC) खुल्या बाजारात इंजेक्शनची विक्री केल्याने संबंधित एजन्सीवर गुन्हा दाखल करावा, (Adwance given by NMS) तसेच आगाऊ देयकांची रक्कम अदा करूनही उत्पादक कंपनीने अपुरा पुरवठा केल्याने नोटीस बजावण्यात यावी, असे आदेश स्थायी समिती सभापती गणेश गिते (Chairmen Ganesh Gite) यांनी दिले.

सध्या कोरोनाची स्थिती निवळली आहे. दोन महिन्यांपासून महापालिका रुग्णालयांतील रुग्णांचे औषधे, इंजेक्शन अभावी हाल होते. कोरोनाग्रस्त रुग्ण वेदनेने तळमळत होते. मात्र कंपनीला आगाऊ पैसे देऊनही त्यांनी औषधे दिले नाहीत. तेव्हाच ही कारवाई केली असती तर कदाचीत औषधे मिळून रुग्णांना दिलासा मिळाला असता. मात्र उशीरा का होईना भाजप व महापालिकेतील नगरसेवकांना आता जाग आली आहे. 

स्थायी समितीच्या सभेत वैद्यकीय विभागाच्या हलगर्जीपणावर टीका करण्यात आली. शिवसेनेचे सुधाकर बडगुजर यांनी रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या मुद्द्यावर वैद्यकीय विभागाला धारेवर धरले. कोरोनाबाधितांवर रेमडेसिव्हिर इंजेक्शन काही प्रमाणात प्रभावी ठरत असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर महापालिकेने ३० मार्च २०२० मध्ये पाच हजार, तर १ एप्रिल २०२१ मध्ये एक हजार इंजेक्शनची ऑर्डर दिली होती. इंजेक्शनचा पुरवठा करण्यासाठी गेट वेल फार्मा एजन्सीसोबत करार करण्यात आला होता. मात्र रेमडेसिव्हिर इंजेक्शनला मागणी वाढली. त्या काळात महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये पुरवठा न करता बाहेर इंजेक्शन विकण्यात आले. वेळेत इंजेक्शन न मिळाल्याने महापालिकेच्या रुग्णालयातील रुग्ण दगावले. त्यामुळे एजन्सीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सुधाकर बडगुजर यांनी केली.

गेल्या वर्षभरात गेट वेल एजन्सीकडे रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा किता माल आला, प्राप्त झालेला माल कोणाला दिला या संदर्भात चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांना अन्न व औषध प्रशासनाकडून संबंधित कंपनीला रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा किती पुरवठा झाला, यासंदर्भातील अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सलीम शेख यांनी महापालिकेकडे इंजेक्शन उपलब्ध नसताना काळा बाजार होत असल्याची बाब गंभीर असल्याने मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

इंजेक्शनचा गैरवापर
रेमडेसिव्हिर इंजेक्शन रुग्णांना देताना फिजिशिअनची चिठ्ठी आवशक्य असते. महापालिकेच्या बिटको व झाकिर हुसेन रुग्णालयात फिजिशिअन नसताना रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा वापर कसा झाला, असा प्रश्‍न उपस्थित करताना संशय व्यक्त केला. तसेच नवीन बिटको रुग्णालयात दहा दिवसांपासून रेमडेसिव्हर इंजेक्शन उपलब्ध नसल्याने जबाबदारी निश्‍चित करण्याची मागणी श्री. बडगुजर यांनी केली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागरगोजे यांना रुग्णालयाचे व्यवस्थापन जमत नसल्याने महापालिकेची नाचक्की होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

यासंदर्भात स्थायी समितीचे सभापती गणेश गिते म्हणाले, आगाऊ रक्कम अदा करूनही उत्पादक कंपनीने रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा पुरवठा न केल्याने नोटीस बजावण्याच्या, तसेच गेट वेल फार्मा एजन्सीने करारानुसार पुरवठा न केल्याने गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com