खचलेल्या समाजाला भजन- पूजनाचाच आधार, त्यासाठी होणार आंदोलन !

गेल्या पाच महिन्यांपासून कोरोना संकटामुळे भाविक समाज मानसिकदृष्या खचलेला आहे. या समाजाला आपल्या आराध्य देवतेचे भजन, पूजन, कीर्तन आणि दर्शन करुन मानसिक आधार मिळणे अत्यंत गरजेचे आहे.
खचलेल्या समाजाला भजन- पूजनाचाच आधार, त्यासाठी होणार आंदोलन !

नाशिक : गेल्या पाच महिन्यांपासून कोरोना संकटामुळे भाविक समाज मानसिकदृष्या खचलेला आहे. या समाजाला आपल्या आराध्य देवतेचे भजन, पूजन, कीर्तन आणि दर्शन करुन मानसिक आधार मिळणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी देवस्थाने सुरु करण्यात यावीत. यासाठी शनिवारी राज्य सरकार विरोधात "दार उघड उद्धवा, दार उघड" हे घंटानाद आंदोलन केले जाणार आहे. 

यासंदर्भात आज भारतीय जनता पक्षातर्फे पत्रकार परिषद झाली. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीचे संयोजक आचार्य तुषार भोसले यांनी माहिती दिली. कुंभकर्णापेक्षाही गाढ झोपलेल्या या "ठाकरे सरकार" ला इशारा देण्याकरिता शनिवारी सकाळी अकराला देवस्थाने सुरु करा यासाठी राज्यभर "दार उघड उद्धवा, दार उघड" अशी आर्त हाक देत आम्ही "घंटानाद आंदोलन" करणार आहोत.

ते म्हणाले, संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात मॅाल, मांस, मदिरा चालु झाले आणि देवस्थाने मात्र बंद आहेत. "पुनश्च हरि ओम" च्या नावाखाली सर्व व्यवहार सुरु झाले. "हरि" ला मात्र लॅाक करुन ठेवले आहे. यापेक्षाही वाईट म्हणजे दारु पिणारे आनंदात फिरत आहेत तर भजन-पूजन करणारे भाविक भक्त यांच्यावर मात्र गुन्हे दाखल होऊन त्यांना अटक होत आहे. आस्थेबरोबरच, तिर्थक्षेत्र आणि प्रमुख देवस्थांनांच्या परिसरातील असंख्य लोकांची उपजीविका केवळ देवस्थानांवर अवलंबून असल्याने महाराष्ट्रातील बहुसंख्य लोकांचे जीवन व्यवहार यामुळे ठप्प झाले आहेत. 

राज्यशासन ठरवेल ते सर्व नियम मान्य करुन देवस्थाने आणि भजन, पूजन कीर्तन सुरु करावे ही सर्वांची एकमुखाने मागणी असतानाही, महाराष्ट्रातले मविआ सरकार ती अजूनही मान्य करत नाही याकरिता महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक-आध्यात्मिक संघटना, संस्था, प्रमुख देवस्थानांचे अध्यक्ष, विश्वस्त आणि विविध पंथ- संप्रदायांच्या प्रमुख धर्माचार्यांनी एकत्र येत आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.

या आंदोलनाला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पाठिंबा देऊन पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधींना सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.  विश्व हिंदु परिषदेने देखील पाठिंबा जाहीर केला आहे. अ.भा.संत समिती, अ.भा.वारकरी मंडळ, वारकरी महामंडळ, अ.भा.पुरोहित संघ, जय बाबाजी भक्त परिवार यांच्यासह वारकरी, महानुभाव, लिंगायत, जैन, शीख संप्रदायांच्या प्रमुख धार्मिक संघटना या आंदोलनात सहभागी होतील. 

यावेळी महंत भक्तीचरणदास, आमदार देवयानी फरांदे, आमदार राहूल ढिकले, नाशिक पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, भाजपचे शहराध्यक्ष गिरीष पालवे, सुधीरदास पुजारी आजी उपस्थित होते. 
...
 

https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=n7lpCgTo7rwAX_PWvN_&_nc_ht=scontent.fdel1-3.fna&oh=9312f933ba69467e8b0d61787331e461&oe=5F6C4E27

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com