मंदिरे उघडण्यासाठी नाशिकला `भाजप`कडून  165 ठिकाणी घंटानाद 

धार्मिकस्थळे खुली करण्यात यावी या मागणीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे आज राज्याच्या विविध भागात घंटानाद आंदोलन झाले. नाशिक शहरात पक्षातर्फे 165 हून अधिक ठिकाणी घंटानाद आंदोलन करण्यात आले.
मंदिरे उघडण्यासाठी नाशिकला `भाजप`कडून  165 ठिकाणी घंटानाद 

नाशिक : धार्मिकस्थळे खुली करण्यात यावी या मागणीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे आज राज्याच्या विविध भागात घंटानाद आंदोलन झाले. नाशिक शहरात पक्षातर्फे 165 हून अधिक ठिकाणी घंटानाद आंदोलन करण्यात आले. शहरातील प्रमुख मंदिरासमोर, जैन मंदिर, गुरुव्दारा व बैध्द स्मारक परिसरात हे आंदोलन झाले. 

यासंदर्भात भाजपा आध्यात्मिक आघाडी प्रदेश संयोजक तुषार भोसले, शहराध्यक्ष गिरीष पालवे, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, पवन भगुरकर, सुनिल केदार, जगन अण्णा पाटील  यांनी माहिती दिली. शहरात रामकुंडावर  गंगागोदावरी मंदिर परिसरात घंटानाद करण्यात आला. यावेळी प्रदेश सरचिटणीस आमदार देवयांनी फरांदे, आमदार राहुल ढिकले, ज्येष्ठ नेते सुनिल बागुल, पंचकोठी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतिष शुक्ल, प्रदिप पेशकार, प्रविण अलई, सुनिल केदार, मोहन गायधनी, महंत भक्तीचरण दास महाराज, रामनारायण दास फलाहारी बाबा, सुधीरदास पुजारी, महंत सोमेश्वरानंद महाराज, वारकरी संप्रदायाचे सोपान महाराज, कैलास मठाचे ब्रम्हाजी, प्रतिक शुक्ल आदी उपस्थित होते.

नगरसेवक तथा भाजपा महानगर संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव नेतृत्वाखाली कालिका मंदिराच्या बाहेर राज्यातील मंदिराचे द्वार खुले करावे या करिता ठाकरे सरकारचे लक्ष वेधण्याकरिता घंटा नाद आंदोलन करतांना शैलेश जुन्नरे, अरुण शेंदूर्णीकर, डॉ.प्रशांत पाटील, नंदकुमार देसाई, विश्वास पारणेरकर, राजेंद्र निंबाळते, सुजाता करजगिकर, संदीप गोसावी, शिवम शिंपी  आदी उपस्थित होते.

बुध्द स्मारक खुले करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी गणेश कांबळे, कुणाल वाघ, शशांक हिरे, संजय जाधव, भगवान दोंदे, संजय काळे, दिलीप जाधव, विजय तेजाळे आदी उपस्थित होते. महात्मानगर येथील गणपती मंदिर येथे प्रदेश सदस्य व पॅनॅलिस्ट लक्ष्मण सावजी, शहर उपाध्यक्ष निलेश बोरा, तुषार कुलकर्णी, अमोल गांगुर्डे, पंकज भुजंग, प्रदीप हरकरे, होळकर व नागरिक उपस्थित होते. मध्य मंडल अध्यक्ष देवदत्त जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली 27 ठिकाणी घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी वसंत उशीर, महिला मोर्चा शहराध्यक्षा हिमगौरी आडके, स्वाती भामरे, निलेश बोरा, धंनजय पुरोहीत, ऋषिकेश ठाणगांवकर, अनिकेत पाटील, ललिता बिरारी, अलका जांबेकर, सोनाल दगडे, विजय गायखे, मनिषा देवरे आदी उपस्थित होते.

जैन तीर्थ विल्होळी येथे नाशिक शहर व्यापारी आघाडीतर्फे ही आंदोलन करण्यात आले. यावेळी मयुर सराफ, शशिकांत शेट्टी, प्रतिक नादुर्डीकर, रवी जैन, सागर अडगांवकर, मनीष रघुवंशी, मंगेश पगार, चारुहास घोडके आदी उपस्थित होते. नाशिक रोड येथील मुक्तिधाम मंदीर, हनुमान मंदीर देवळाली गाव, जैन मंदीर, बिरला मंदीर, दुर्गा देवी मंदीर, बौध्द विहार देवी चौक, गुरुद्वारा येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी नगरसेविका संगीता गायकवाड, कोमल मेहरोलीया, सुजात जोशी, सतिश रत्नपारखी, किरण पगारे, प्रशांत भागवत, जयगोपाल सिंग, शेरासिंग, बलविद्र सिंग बाबा प्रकाश घुगे, नाशिकरोड मंडल अध्यक्ष हेमंत गायकवाड, राजेश आढाव आदी उपस्थित होते.

व्दारका मंडल अध्यक्ष सुनिल देसाई यांच्या नेतृत्वाखाली श्री गुरुदेव दत्त मंदिर सेवा संस्थान, इंदिरानगर येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी राजश्री शौचे, अॅड.भानुदास शौचे , बापू गोरे, रमाकांत अलई , रामचंद्र बधान, गोपाळकृष्ण गर्गे, संतोष सोनवणे, दौलत उगले, नंदाबाई खरात, शिवाजी विसपुते, शैलजा विसपुते आदी उपस्थित होते. पंचवटी मंडल अध्यक्ष ज्ञानेश्वर काकड यांच्या मार्गदर्शनाखाली 12 ठिकाणी, तपोवन मंडल अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी यांच्या नेतृत्वाखाली 12 ठिकाणी, सातपूर मंडल अध्यक्ष अमोल इघे यांच्या मार्गदर्शनाखाली 17 ठिकाणी, सिडको मंडलात 1 अध्यक्ष शिवाजी बरके यांच्या मार्गदर्शनाखाली 18 ठिकाणी तसेच सिडको मंडल-2 अध्यक्ष अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 31 ठिकाणी राज्यातील मंदिराचे द्वार खुले करावे या करिता ठाकरे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी घंटानाद आंदोलन झाले. 
...

https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=G0xWUVK_R18AX8-xwdb&_nc_ht=scontent.fdel1-3.fna&oh=436efd3ed1703550c49e3821e3d276c7&oe=5F7042A7

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com