Birthday....Balasaheb Sanap, Ex MLA | Sarkarnama

आजचा वाढदिवस....बाळासाहेब सानप, माजी आमदार, नाशिक

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 30 जून 2020

बाळासाहेब सानप हे शहरातील सामान्य कुटुंबातून राजकारणात प्रभाव निर्माण केलेले नेते आहेत. शहराचे चार वेळा नगरसेवक, स्थायी समितीचे सभापती, उपमहापौर, भाजपचे शहराध्यक्ष, महापौर आणि आमदार असा त्यांचा चढता राजकीय प्रवास आहे.

नाशिक शहरात तळागाळातील कार्यकर्ता म्हणून राजकारणात यशस्वी झालेल्या कार्यकर्ते, नेते म्हणून माजी आमदार बाळासाहेब सानप आवर्जुन उल्लेख केला जातो. प्रारंभी कॅांग्रेस पक्षातून कामाला सुरवात केलेले श्री. सानप यांनी महापालिका निवडणूकीत भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी करुन नगरसेवक झाले.

श्री. सानप सलग चार वेळा नगरसेवक होते. प्रभा सभापती, उपमहापौर, महापौर, भाजपचे शहराध्यक्ष अशा विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. नाशिक शहरात भाजपच्या संघटनात्मक विस्तारात त्यांचा मोठा सहभाग आहे. पंचवटीतील संत ज्ञानेश्वर अभ्यासिक व वाचनालयाचे ते अध्यक्ष आहेत.

पंचवटी परिसरातील एका सामान्य कुटुंबातील श्री. सानप यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांनाच दूधविक्रीचा व्यवसाय सुरु केला. त्यातून त्यांचा संपर्क वाढला. विविध सामाजिक उपक्रम त्यांनी सुरु केले. 2014 मध्ये विधानसभेच्या निवडणूकीत ते भारतीय जनता पक्षाचे नाशिक पूर्व मतदारसंघाचे आमदार झाले. तत्कालीन पालकमंत्री गिरीस महाजन यांचे ते विश्वासू सहकारी होते. या काळात त्यांनी अनेक सामान्य कार्यकर्त्यांना विविध पदावंर संधी दिली. पुढे श्री. महाजन यांच्याशी मतभेद झाले. पक्षाने या मतदारसंघातून विद्यमान आमदार सानप यांच्याएैवजी आयात उमेदवाराला संधी दीली. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी कॅाग्रेसमध्ये प्रेवश केला. मात्र निवडणूकीत त्यांचा पारभव झाला. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सध्या ते शिवसेनेचे शहरातील प्रमुख नेते आहेत. आगामी महापालिका निवडणूकीसाठी ते शिवसेनेच्या संघटनात्मक विस्तारासाठी प्रयत्नशील आहेत. 
....
 

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख