बिजली..... तुमचा एक नंबर वरून लास्ट नंबर झाला आहे !  - Bijli...You are On last number from first | Politics Marathi News - Sarkarnama

बिजली..... तुमचा एक नंबर वरून लास्ट नंबर झाला आहे ! 

हर्षवर्धन बोऱ्हाडे
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी नाशिकरोड येथील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर आज उपनगर व नाशिकरोड पोलीस स्टेशनची तपासणी केली. पोलिस ठाण्यांची पाहणी केली. यावेळी त्यांनी कामकाजाविषयी नाराजी व्यक्त केली.

नासिक रोड :  नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी नाशिकरोड येथील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर आज उपनगर व नाशिकरोड पोलीस स्टेशनची तपासणी केली. पोलिस ठाण्यांची पाहणी केली. यावेळी त्यांनी कामकाजाविषयी नाराजी व्यक्त केली.

यावेळी त्यांनी नासिक रोड पोलीस निरीक्षकांसह अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. नाशिक रोड पोलिस ठाण्याच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करीत, पोलिस निरीक्षक सूरज बिजली यांना "तुमचे कामकाज तर एक नंबर वरून लास्ट नंबर वर आले आहे' अशा शब्दांमध्ये पोलीस आयुक्तांनी त्यांना खडे बोल सुनावले. 

नासिक रोड येथे गेल्या दोन महिन्यापासून गावठी कट्टे कोयते तलवारी मोठ्या प्रमाणावर सापडत आहेत. हाणामाऱ्या, चोऱ्या, दरोडे, खुनाच्या घटना देखील मोठ्या प्रमाणावर घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त पांडे यांनी आज नाशिक रोड आणि उपनगर पोलिस ठाण्याला भेट दिली. यावेळी त्यांनी गुन्हेगारीचा आढावा घेतला. यामध्ये पांडे यांनी नाशिक रोड पोलिस स्टेशनच्या जुन्या इमारतीची पाहणी केली. पोलिस ठाण्याच्या आवारातील विविध जप्त वस्तू, इमारतीतील साधने, यंत्रणा काम करतात, की नाही याचीही स्वतः तपासणी केली. या पाहणीत त्यांनी "बिजली, तुमचे कामकाज तर, एक नंबर वरून लास्ट नंबर वर आले आहे' अशा शब्दात अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. यावेळी पोलिस उपायुक्त विजय खरात, नासिक रोड कारागृहाचे पोलीस अधीक्षक प्रमोद वाघ, अशोक कारकर यांसह पोलिस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

गुन्हेगारीवर नियंत्रण हवे
नासिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढल्याच्या तक्रारी आहेत. संघटित गुन्हेगारीने परिसरातील वातावरण बिघडत असल्याच्या तक्रारी सातत्याने चर्चेत आहेत. असे असताना आयुक्तांनी येथील गुन्हेगारीचा आढावा घेतला. तपासाच्या कामकाजाची माहिती घेतली. त्यातील त्रुटी दुर करण्याच्या सुचना दिल्या. व्यवस्थीत माहिती न देऊ शकलेल्या काही अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांनी चांगलेच फैलावर घेतले. दिवाळीच्या धामधुमीत गुन्हेगारी नियंत्रणात राहील याची काळजी घ्या. त्यासाठी सर्व प्रकारे दक्षता घेऊन दिवसा व रात्रीची गस्त वाढवा, गैरप्रकार होऊ नये यासाठी उपाय योजना करण्याचे निर्देश दिले. नासिक रोड पोलिस स्टेशनची वाटचाल यापूर्वी शहर पोलिसांत अतिशय चांगली होती. त्यांचे कामकाज पहिल्या क्रमांकावर होते. सध्या ती शेवटच्या क्रमांकावर पोहोचली. त्यात सुधारणा करावी असे आयुक्तांनी सांगितले. 
... 
 

https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख