भुजबळांच्या कोपरखळ्यांनी देवेंद्र फडणवीसांना ठसके? - Bhujbal`s tweezers thump bjp leaders, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

भुजबळांच्या कोपरखळ्यांनी देवेंद्र फडणवीसांना ठसके?

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 8 जुलै 2021

बारा आमदारांच्या निलंबनानंतर आज शहरात महापालिकेच्या बससेवेच्या कार्यक्रमासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ एकाच व्यासपीठावर आले होते. त्यामुळे ते काय बोलतात, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. या वेळी फडणवीस यांनी आपल्या भाषणात राजकीय भाष्य टाळले. मात्र भुजबळांच्या खास शैलीतील कोपरखळ्यांनी भाजप नेत्यांना  ठसके लागले.

नाशिक : बारा आमदारांच्या निलंबनानंतर आज शहरात महापालिकेच्या बससेवेच्या कार्यक्रमासाठी (Inuaguration of Bus service) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ (After 12 MLA suspension BJP leader Devndra Fadanvis and Minister Chhagan Bhujbal came on one dias firsttime)  एकाच व्यासपीठावर आले होते. त्यामुळे ते काय बोलतात, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. या वेळी फडणवीस यांनी आपल्या भाषणात राजकीय भाष्य टाळले. (Fadanvis avoide Political statements) मात्र भुजबळांच्या खास शैलीतील कोपरखळ्यांनी भाजप नेत्यांना  ठसके लागले.  

श्री. भुजबळ यांनी भाषणातून सत्ताधारी भाजपच्या नेत्यांना काढलेले शाब्दिक चिमटे चर्चेचा विषय ठरले. महापौर सतीश कुलकर्णी यांनी कोरोनावर मात करण्यासाठी जलनेती क्रिया स्वीकारण्याचे आवाहन केले. त्याला अनुसरून ते म्हणाले, की कोरोनामुळे अडचणीत आलेल्या लोकांच्या नाका-तोंडात पाणी गेले आहे. त्यामुळे नाकातून पाणी काढणारी जलनेती काय करणार?. भुजबळांच्या या सवालाने सभागृहात अगदी भाजपच्या नेत्यांसह सगळ्यांनाच आपले हसू लपवता आले नाही. 

अभिनेते दिलीपकुमार यांच्या निधनाने नाशिककरांच्या एका डोळ्यात असू, तर डॉ. भारती पवार यांना मंत्रिपद मिळाल्याने दुसऱ्या डोळ्यात हसू असल्याचा उल्लेख त्यांनी केला. ते म्हणाले, की दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आता दोन मंत्रिपदे आहेत. त्यामुळे मला दुहेरी आनंद झाला आहे. आरोग्य मंत्रिपद मिळाल्याने आता तिसऱ्या लाटेचा सामना करण्यास मदत मिळू शकते. रेमडेसिव्हिर व म्युकरमायकोसिस आजारावरच्या औषधांसाठी मीदेखील आता हक्काने फोन करू शकतो, असा चिमटा त्यांनी काढला.

श्री. फडणवीस यांनी सीएनजी, इथेनॉल इंधनाचा वापर करण्याचा सल्ला दिला होता. त्यावर भुजबळ म्हणाले, की डिझेलच्या किमती वाढल्याने फडणवीस यांच्या सल्ल्याचा विचार करण्याचे आवाहन मी स्वतः करतो, त्यांच्या या वाक्यानंतर फडणवीसांसह व्यासपीठावरील सगळ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुटले.

यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे ऑनलाईन उपस्थित होते. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विशेष संदेश पाठवला. महापौर सतीष कुलकर्णी, उपमहापौर भिकुबाई बागूल, माजी मंत्री गिरीष महाजन, माजी मंत्री जयकुमार रावल, स्थायी समितीचे अध्यक्ष गणेश गिते, महापालिकचे आयुक्त कैलास जाधव, आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, आमदार राहूल ढिकले, माजी आमदार बाळासाहेब सानप, कमलेश बोडके, गटनेते अरुण पवार, शिवसेनेचे गटनेते अजय बोरस्ते, विलास शिंदे, दिक्षा लोंढे उपस्थित होते.
...
हेही वाचा...

भारती पवारांचे मंत्रीपद... सांगितले बंगलोरला अन् गेल्या दिल्लीला!

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख