कोरोनाच्या रुग्णांसाठी युवकांनी सुरू केली "लॅब डोअर' संकल्पना - Bhujbal inougrate lab door project Of Yeola ypuths | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोनाच्या रुग्णांसाठी युवकांनी सुरू केली "लॅब डोअर' संकल्पना

संपत देवगिरे
रविवार, 12 जुलै 2020

येथील युवकांच्या पुढाकाराने कोरोना रुग्णांसह सर्व प्रकारच्या तपासण्यांसाठी "घरपोच पॅथलॅब' ही संकल्पना सुरू केली आहे. ही सुविधा कोरोना संकटाच्या काळात नागरिकांसाठी अत्यंत उपयोगी ठरणार आहे. 
 

नाशिक : येथील युवकांच्या पुढाकाराने कोरोना रुग्णांसह सर्व प्रकारच्या तपासण्यांसाठी "घरपोच पॅथलॅब' ही संकल्पना सुरू केली आहे. ही सुविधा कोरोना संकटाच्या काळात नागरिकांसाठी अत्यंत उपयोगी ठरणार आहे. 

या उपक्रमाचे उद्‌घाटन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी केले. लॅब डोअर या नावीन्यपूर्ण संकल्पनेचे उद्‌घाटन ऑनलाइन झाले. भुजबळ म्हणाले, की राहुल निकम व अजय शेलार या दोन युवकांनी एकत्र येऊन मुंबई व दिल्लीनंतर नाशिकमध्ये प्रथमच अशा संकल्पनेला सुरवात केली आहे. नाशिक शहर व परिसरातील नागरिकांसाठी संकेतस्थळाच्या माध्यमातून घरपोच पॅथलॅब सुविधा मिळाव्यात, यासाठी त्याची सुरवात केली आहे. हे युवक सकाळी सहापासून सॅम्पल गोळा करण्यास सुरुवात करणार आहेत. सर्वसामान्यांना याचा अधिक फायदा होईल. या चाचणीचा अहवाल त्या रुग्णाला त्याच्या घरी ई-मेल तसेच व्हॉट्‌सऍपच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यासाठी दरही कमी ठेवण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा फायदा होईल आणि ज्यांत लक्षण जाणवत नाही, अशा काही आजारांचेही निदान या चाचणी अहवालातून होणार आहे. 

सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना या चाचण्या मार्गदर्शक म्हणून काम करतील. संकेतस्थळावर नोंदणी करून घरपोच सेवा मिळवून आपल्या आरोग्यासंदर्भात असलेल्या सर्व चाचण्या करवून घेण्याचे आवाहन पालकमंत्री भुजबळ यांनी केले. येवला पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, मराठा उद्योजक लॉबीचे संचालक चिंतेश्‍वर देवरे, डॉ. मंजुश्री घाटी, मच्छिंद्र शेलार, प्रवीण पवार, संतोष जायभावे, संचालक राहुल निकम व अजय शेलार ऑनलाइन उपस्थित होते. 
...
 

https://scontent-frt3-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_4607380974576...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख