नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते भावली धरणाचे जलपूजन                         - Bhavli damm waters worship by Narhari Zirwal; Nashik Politics         | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

आमदार आशुतोष काळे शिर्डी संस्थानचे अध्यक्ष तर उपाध्यक्षपदी जगदीश सावंत यांची नियुक्ती
माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची याचिका फेटाळली
जगातील प्रभावशाली व्यक्तींमध्ये नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, अदर पूनावाला
तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकरांची वर्णी
अभिनेता सोनू सूदच्या घरावर आयकर विभागाचा छापा

नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते भावली धरणाचे जलपूजन                        

संपत देवगिरे
गुरुवार, 29 जुलै 2021

इगतपुरी तालुक्यातील भावली धरण पूर्ण भरल्याने आज विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. यंदाच्या पावसाळ्यात सर्वप्रथम पूर्ण क्षमतेने भरलेले हे पहिले धरण आहे. 
                            

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील भावली धरण पूर्ण भरल्याने (Bhavli damm of Igatpuri overflow) आज विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. (Water worship by Naarhari Zirwal) यंदाच्या पावसाळ्यात सर्वप्रथम पूर्ण क्षमतेने भरलेले हे पहिले धरण आहे. 
 

धरणांचा जिल्हा व महाराष्ट्राचे चेरापुंजी अशी ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्याला धरणांचा जिल्हा म्हटले जाते. वैतरणा, अप्पर वैतरणा, दारणा, कडवा, भाम, भावली, मुकणे यांसह विविध मोठी धरणे आहेत. इगतपुरी लगतच्या सह्याद्री माथ्यावर सर्वाधीक तीन हजार मिलीमीटर पाऊस होतो. ब्रिटीश राजवटीत बांधण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील पाटबंधारे प्रकल्पांत १९१५ मध्ये येथे दारणा धरण बांधण्यात आलेले आहे. इगतपुरीतील पाऊस व धरणांच्या साठ्यामुळे नांदूरमधमेश्वर प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाडा अर्थात जायकवाडी धरणाला लाभ होतो. यंदा पावसाची कमतरता असल्याने भावली धरण भरल्याने श्री. झिरवाळ यांनी समाधान व्यक्त केले.    

भावली धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता एक हजार ४३४ दशलक्ष घनफुट आहे. भावली धरण क्षेत्रात आज अखेर दोन हजार १८३ मि.मी. पाऊस झाला आहे. धरण पूर्णपणे भरल्याने आज जलपुजन करण्यात आले. या धरणातून आतापर्यंत ४५० क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांनी यावेळी दिली.
 

जलपूजन प्रसंगी आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार शिवराम झोले, जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, कार्यकारी अभियंता सागर शिंदे, उपविभागीय अभियंता अरूण निकम, तहसीलदार परमेश्वर कासुळे, पोलीस निरीक्षक सुधाकर नागरे, गटविकास अधिकारी लता गायकवाड, शाखा अभियंता सुरेश जाचक, घोटी बाजार समितीचे संदिप गुळवे आदी उपस्थित होते.
...

हेही वाचा...

गोदावरी आणि ब्रम्हगिरीच्या संरक्षणासाठी अजिबात तडजोड नाही

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख