`भंडारा` घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार - Bhandara Incidents responsible will be punished | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, उद्धव ठाकरे आज एकाच व्यासपीठावर

`भंडारा` घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 9 जानेवारी 2021

भंडारा जिल्हा रुग्णालयात आग लागल्याने लहान मुलांचा मृत्यू झाला. ही घटना अतिशय दुःखद आहे. या घटनेची सखोल चौकशी करून सरकार गंभीर कारवाई करण्यात येईल.

नाशिक : भंडारा जिल्हा रुग्णालयात आग लागल्याने लहान मुलांचा मृत्यू झाला. ही घटना अतिशय दुःखद आहे. या घटनेची सखोल चौकशी करून सरकार दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

भंडारा जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत दुर्दैवाने मृत्यू झालेल्या लहान मुलांविषयी श्री. भुजबळ यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. या घटनेची चौकशी करून भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी सरकार प्रयत्न करेल असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यांनी म्हटले आहे की, भंडारा जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीची कारणे काय आहेत हे तपासण्याची गरज आहे. अनेक रूग्णालये, नर्सिंग होम यांची फायर ऑडिट करण्याची गरज आहे. अनेक रूग्णालयामध्ये वायरींग वर्षोनुवर्षे बदलली नाही, त्यावरच रुग्णालयातल्या विविध मशीन चालत असतात त्यामुळे ती बदलण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

या दुर्घटनेत जिल्हा शासकीय रुग्णालयातील परिचारीका आणि काही कर्मचाऱ्यांनी ७ बालकांना वाचवले आहे. त्या कर्मचाऱ्यांचे आपण आभार मानले पाहिजे पण दुर्दैवाने आपण १० बालकांना वाचवू शकलो नाही. त्या बालकांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. 
...
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख