Bhalchandra Patil becames youngest Presidsnt of Janlaxmi Bank | Sarkarnama

भालचंद्र पाटील बनले जनलक्ष्मी बॅंकेचे सर्वांत तरुण अध्यक्ष

संपत देवगिरे
मंगळवार, 30 जून 2020

जनलक्ष्मी बॅंकेचे संस्थापक, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी खासदार (कै.) माधवराव पाटील यांच्या पश्‍चात त्यांचे पुत्र भालचंद्र पाटील यांची आज बॅंकेच्या अध्यक्षपदी निवड झाली. या बॅंकेचे ते सर्वांत तरुण अध्यक्ष ठरले आहेत.

नाशिक : जनलक्ष्मी बॅंकेचे संस्थापक, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी खासदार (कै.) माधवराव पाटील यांच्या पश्‍चात त्यांचे पुत्र भालचंद्र पाटील यांची आज बॅंकेच्या अध्यक्षपदी निवड झाली. पाटील यांच्या दुसऱ्या पिढीतील भालचंद्र हे या बॅंकेचे सर्वांत तरुण अध्यक्ष ठरले आहेत. निवड झाल्यावर त्यांनी बॅंकेला पुनर्वैभव प्राप्त करून देणार, असा विश्‍वास व्यक्त केला. 

माजी खासदार पाटील यांनी 1976 मध्ये या बॅंकेची स्थापना केली. भागभांडवल गोळा करणे, स्थापनेची प्रक्रिया पूर्ण होऊन रिझर्व्ह बॅंकेने बॅंकेला बॅंकिंग परवाना दिला. तेव्हापासून आजतागायत या बॅंकेने गोरगरीब, मध्यमवर्ग, पगारदार, कारखानदार, शाळा, कॉलेजेस, दवाखाने, सहकारी साखर कारखाने, कुक्कुटपालन उद्योग, शेती अशा सर्व स्तरांतील घटकांना कर्जपुरवठा केला. बॅंकेची स्थापनाच सर्वसामान्य घटकांकरिता झालेली असून, यापुढेही ही बॅंक सर्वसामान्यांचीच बॅंक राहील. शहरामधील ठेवीदार, खातेदार, भागधारक, हितचिंतक यांनी या बॅंकेवर आजपर्यंत दाखवलेला विश्‍वास यापुढेही सार्थ ठरविला जाईल. संचालक मंडळाच्या सहकार्याने बॅंकेला गतवैभव प्राप्त करून देणार, असा विश्‍वास नवनिर्वाचित अध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी व्यक्त केला. 
ज्येष्ठ संचालक उत्तमराव कांबळे, रामरतन करवा यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. स्पर्धेच्या युगात टीकायचे असेल, तर आधुनिक व्यवस्थापन, कुशल कर्मचारीवर्ग, व्यवसायवाढीकरिता झटणारे संचालक मंडळ व नाशिककरांची साथ घेऊन नाशिककरांसाठी स्थापन झालेली ही बॅंक यापुढेही सर्वसामान्यांना मदत करीत राहील. नाशिककरांनी बॅंक परिवाराच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहन याप्रसंगी नवनिर्वाचित अध्यक्ष पाटील यांनी केले. 

निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती प्रेरणा शिवदास यांच्या अध्यक्षतेखाली एकमताने तरुण उद्योजक पाटील यांची निवड करण्यात आली. ते बॅंकेचे सर्वांत तरुण अध्यक्ष ठरले आहेत. या वेळी उपाध्यक्ष उत्तमराव कांबळे, संचालक जयंतभाई जानी, रामरतन करवा, रमेश चांदवडकर, अनुराधा केळकर, स्वप्ना निंबाळकर, श्रीकांत रहाळकर, उत्तमराव उगले, संजय चव्हाण, संदीप नाटकर, रवींद्र अमृतकर, शरद गांगुर्डे, सतीश सोनवणे, मिलिंद पोफळे, निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती प्रेरणा शिवदास, बॅंक अधिकारी मोहन गवळी, अजित मांडवगने उपस्थित होते.  

https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख