नगरपंचायत निवडणुकीच्या तयारीला लागा  : छगन भुजबळ  - Be Ready for Upcoming Elections in the Districts | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सातारा : कोयना परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भुकंपाची साखळी वेळ-3.22 रिश्टर स्केल-3.00, वेळ-3.44 रिश्टर स्केल-2.8.

नगरपंचायत निवडणुकीच्या तयारीला लागा  : छगन भुजबळ 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

जिल्ह्यात येऊ घातलेल्या आगामी नगरपंचायती निवडणुकीच्या तयारीला लागा, अशा सूचना राज्याचे अन्न,नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आज दिल्या.

नाशिक : पक्षाच्या कामकाजाचा आढावा घेऊन कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी पुर्वतयारी करुन निवडणूकींना सामोरे जावे. त्यासाठी जनतेच्या अडचणी, शहराच्या विकासाचे प्रश्‍न समजून घेऊन मतदारांत विश्‍वास निर्माण करावा, असे राज्याचे अन्न,नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. 

जिल्ह्यातील आगामी नगरपंचायती निवडणुकीच्या तयारीला लागा, अशा सूचना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी आज दिल्या. जिल्ह्यात आगामी नगरपंचायती निवडणुकींच्या पार्श्वभुमीवर भुजबळ फार्म कार्यालयात श्री. भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यात लवकरच कळवण, निफाड, चांदवड, देवळा, दिंडोरी, पेठ, सुरगाणा या नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली. त्यात सर्व नगरपरिषदांचा आढावा घेऊन पक्षाची ताकद वाढवावी. निवडणूकीत नगरसेवकांची संख्या कशी वाढेल, यासाठी तयारी करण्याच्या सूचना दिल्या. 

दिंडोरी, पेठ नगरपंचायत निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, निफाड नगरपंचायतीची जबाबदारी आमदार दिलीप बनकर, कळवण, सुरगाणा नगरपंचायतीची जबाबदारी आमदार नितीन पवार, चांदवड, देवळा नगरपंचायत निवडणुकीची जबाबदारी जिल्हा परिषद उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड यांना देण्यात आली. लवकरच नगरपंचायत निहाय बैठका घेण्याचे निश्‍चित करण्यात आले. 

यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, माजी खासदार समीर भुजबळ, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार, आमदार दिलीप बनकर, आमदार नितीन पवार, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. सयाजी गायकवाड, निफाड तालुकाध्यक्ष राजेंद्र डोखळे, कळवण तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, शहराध्यक्ष जितेंद्र पगार, देवळा तालुकाध्यक्ष यशवंत शिरसाठ, शहराध्यक्ष जितेंद्र आहेर, दामु राऊत, प्रकाश शेळके, राजु पवार, योगेश आहेर, नवनाथ आहेर, देवीदास शेलार, शाम हिरे, सुनिल कबाडे, रिझवान घासी, तौसिफ मनियार, भुषण पगार, सागर कुंदे, जयेश पगार, गोपाळ धुम, जितेंद्र जाधव उपस्थित होते. 
... 
 

https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख