कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत सतर्क राहा 

कोविडच्या तिसऱ्या लाटेचा धोका आरोग्यतज्ज्ञांनी वर्तविला असताना ‘डेल्टा’ विषाणूचा प्रसार वेगाने होऊ लागला आहे.कोविडव्यतिरिक्त चिकूनगुनिया, मलेरिया, डेंगी या आजारांबाबतही सतर्क राहून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या सूचना आमदार नितीन पवार यांनी कळवण व सुरगाणा तालुक्यांतील आरोग्य यंत्रणेला दिल्या.
Nitin Pawar NCP
Nitin Pawar NCP

कळवण : कोविडच्या तिसऱ्या लाटेचा धोका आरोग्यतज्ज्ञांनी वर्तविला (Expert predict a third wave of covid19) असताना ‘डेल्टा’ विषाणूचा प्रसार वेगाने होऊ लागला आहे. (Delta virus spreading speedly) कोविडव्यतिरिक्त चिकूनगुनिया, मलेरिया, डेंगी या आजारांबाबतही सतर्क (we should alert about Chikunguniya, malaria & dengue) राहून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या सूचना आमदार नितीन पवार (Nitin Pawar) यांनी कळवण व सुरगाणा तालुक्यांतील आरोग्य यंत्रणेला दिल्या. 

कळवण प्रकल्पाधिकारी कार्यालयात आमदार नितीन पवार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. त्या वेळी त्यांनी विविध विभागांचा आढावा घेतला. कोरोना सद्यःस्थिती, लसीकरण, संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत उपाययोजना, कळवण, सुरगाणा तालुक्यांतील शासकीय विभागांच्या कामांचा आढावा या वेळी घेण्यात आला. कोविड सेंटरमधील रुग्ण खाटा, औषधे, इंजेक्शनचा साठा, ऑक्सिजन प्लांट यंत्रणा आणि पुरवठा याची खातरजमा करण्याचे निर्देश आमदार पवार यांनी प्रशासन व आरोग्य यंत्रणेला दिले. 

सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीणा, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल गायकवाड, कळवणचे तहसीलदार बी. ए. कापसे, सुरगाणा तहसीलदार विजय सूर्यवंशी, मुख्याधिकारी सचिन पटेल, पोलिस निरीक्षक समाधान नागरे, सुरगाणा पोलिस निरीक्षक कोळी, अभोणा पोलिस उपनिरीक्षक गणेश शिंदे, कळवणचे गटविकास अधिकारी दादाजी जाधव यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. 
नागरिकांना सहकार्य करावे... 

रस्ते, पाणी, वीज, पशुसंवर्धन, महावितरण, सिंचन, ग्रामविकास, वन विभाग, शासकीय योजना, नुकसानभरपाई, पीकपाहणी यांचा आढावा घेऊन नागरिकांची पिळवणूक न करता सहकार्य करण्याबाबतची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिली. 
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com