"कोरोना'मध्ये "बार्टी'ने केले 18 हजार कुटुंबाचे सर्वेक्षण 

कोरोनाच्या संकटकाळात "बार्टी'ने स्मार्ट वर्कच्या माध्यमातून समतादूतांमार्फत विविध माहिती संकलनाचे काम सुरू केले आहे. यामध्ये पारंपारिक पद्धतीचे व्यवसाय करुन उदरनिर्वाह करणाऱ्या लुप्त स्वरुपातील 59 अनुसूचित जातींचे समतादूतांमार्फत गावपाळतीवर सर्वेक्षण केले आहे.
"कोरोना'मध्ये "बार्टी'ने केले 18 हजार कुटुंबाचे सर्वेक्षण 

नाशिक : कोरोनाच्या संकटकाळात "बार्टी'ने स्मार्ट वर्कच्या माध्यमातून समतादूतांमार्फत विविध माहिती संकलनाचे काम सुरू केले आहे. यामध्ये पारंपारिक पद्धतीचे व्यवसाय करुन उदरनिर्वाह करणाऱ्या लुप्त स्वरुपातील 59 अनुसूचित जातींचे समतादूतांमार्फत गावपाळतीवर सर्वेक्षण सुरु केले आहे. नाशिक जिल्ह्यात 489 ग्रामपंचायतींना भेटी व व्हाटस्‌ऍपच्या माध्यमातून अठरा हजार 112 कुटूंबांचे सर्वेक्षण केले आहे. 

समतादूत प्रकल्प अधिकारी प्रतिज्ञा दाभाडे यांनी याबाबत माहिती दिली. त्या म्हणाल्या, राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या पुण्याच्या "बार्टी' संस्थेमार्फत सामाजिक अथवा शासकीय कोणत्याही प्रवाहात नसलेल्या घटकांची नोंद व्हावी, त्यांचीही प्रगती व्हावी, शासनाचे सर्व लाभ त्यांना मिळावे, त्यांचा त्रिस्तरीय दर्जा उंचावा या उद्देशाने ग्रामसेवक तसेच गटविकास अधिकारी यांच्या मदतीने माहिती संकलनाचे काम समतादूतांमार्फत करण्यात येत आहे. कोरोना पार्श्वभूमीवर लॉकडाउनची परिस्थिती असतांना देखिल समतादूत विविध उपक्रमांतर्गत प्रशासनास मदत, सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सहकार्य करत आहेत. 

या प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर राज्यघटनेचे मुलतत्व न्याय, स्वातंत्र, समता, बंधुता या विषयावर प्रबोधन करून समतादूतांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्‍यात जनसामान्यांत ओळख तयार केली आहे. सामाजिक सलोखा, बंधूभाव निर्माण करणे, जातीय दुर्भावनांचा विध्वंस करणे, वैज्ञानिक दृष्टीकोन जागृत करणे, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क अधिकार संविधानाने दिलेले असून त्याबद्दल दुर्लक्षित घटकांना सन्मान व न्याय देणे, थोर संत, समाज सुधारकांचे विचार जनमाणसात पोहचविणे, गावात, शहरात, ग्रामपंचायत, नगरपरिषद, शासकीय अशासकीय संस्था, शाळा कार्यालये, महाविद्यालये आदी ठिकाणी समता, बंधुता, सामाजिक न्याय व विविध सामाजिक उपक्रम समतादूतांमार्फत राबविले जात असल्याचेही प्रकल्प अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी समतादूत प्रशासनास मदत करत आहेत. त्याअंतर्गत कोरोनाच्या काळात कोरोनाबद्दलची जनजागृती, गरीब गरजू लोकांसाठी रेशन वाटप, रूग्णांसाठी सहकार्य, शासकीय रेशन वाटप दुकानाबाहेर गर्दी होवू नये याकरीता सोशल डिस्टस्टिंग पाळण्याची माहिती देण्यासाठी समतादूतांची मदत होत आहे. कोरोनाकाळात परप्रांतीय मजुरांना त्यांच्या मुळगावी जाण्यासाठी प्रशासनाची मदत पोहचविण्याचे काम करण्यात आले. भितीचे वातावरण घालवण्यासाठी नागरिकांचे समुपदेशन करण्यासाठी मदत करीत आहेत. अनुसूचीत जातीच्या सर्वेक्षणाचे काम उत्तमरित्या सुरु आहे. त्यातून शासनास लाभार्थी वर्ग मिळवून देणे सोपे झाले, असे श्रीमती दाभाडे यांनी सांगितले. 
.... 
https://scontent-sin6-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=UVm7B5LNKQAAX9t0Rfd&_nc_ht=scontent-sin6-2.xx&oh=795d693f00c9e42aa2ef9075f348ede5&oe=5F48B5A7

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com