बॅंकांनी "एनपीए' खातेदार शेतकऱ्यांनाही कर्ज द्यावे 

बॅंकांनी शेतकऱ्याप्रती संवेदनशिल रहावे. शेतकऱ्यांना तात्काळ पिककर्ज उपलब्ध करावे. नियमीत कर्जाची परतफेड करणारा एकही शेतकरी पिक कर्जापासून वंचित राहता कामा नये. त्याचबरोबर एखाद्या शेतकऱ्याचे खाते "एनपीए' झाले असल्यास त्याला कर्ज द्यावे.
बॅंकांनी "एनपीए' खातेदार शेतकऱ्यांनाही कर्ज द्यावे 

मालेगाव : बॅंकांनी शेतकऱ्याप्रती संवेदनशिल रहावे. शेतकऱ्यांना तात्काळ पिककर्ज उपलब्ध करावे. नियमीत कर्जाची परतफेड करणारा एकही शेतकरी पिक कर्जापासून वंचित राहता कामा नये. त्याचबरोबर एखाद्या शेतकऱ्याचे खाते "एनपीए' झाले असल्यास त्याला कर्ज द्यावा, असे कृषीमंत्री दादा भुसे यांनी आज येथे सांगितले. 

येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पिककर्ज वाटपाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले, ज्या शेतकऱ्यांचे बॅंक खाते "एनपीए' झाले आहे, अशा खातेदारांबाबत वरिष्ठांचे मार्गदर्शन घेवून त्यांना अधिकाधिक मदत देता येईल, यासाठी पाठपुरावा करावा. शासनाच्या कर्जमुक्ती योजनेच्या अनुषंगाने शासनामार्फत सुमारे 915 कोटीचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. हा निधी शेतकऱ्यांच्या पिककर्जासाठी वापरावा. शेतकऱ्यांना सक्षम व समृध्द करण्यासाठी सर्व बॅंकांचे सहकार्य अपेक्षीत आहे. पिककर्जापोटी मालेगाव तालुक्‍याची नव्वद कोटीची मागणी लक्षात घेता विविध कार्यकारी सोसायट्यांमार्फत प्राप्त झालेल्या प्रस्तांवाचा आढावा यावेळी घेण्यात आला. जिल्हा बॅंकेसह विविध राष्ट्रीयकृत बॅंकांचा आढावा घेतांना आजपर्यंत झालेल्या पिककर्ज वाटपाबाबत नाराजी व्यक्त केली. पिककर्ज वाटपाच्या अनुषंगाने चार बैठका होवूनही पिककर्ज वाटपामध्ये अपेक्षीत लक्ष्यांक पूर्ण होतांना दिसत नाही. त्यामुळे कठोर निर्णय घ्यावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला. 

जिल्हा बॅंकेला सोमवारची मुदत 
जिल्हा बॅंकेमार्फत शेतकऱ्यांना वितरीत होणारी पिककर्जाची रक्कम अपेक्षीत लक्षांकापेक्षा खुप कमी आहे. याची गंभीर दखल कृषीमंत्र्यांनी घेतली असून तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या 122 कोटींपैकी केवळ 22 कोटी चे पीककर्ज वितरीत केले आहे. तालुक्‍याची पीककर्जापोटी 90 कोटीची मागणी आहे. मात्र अत्यल्प कर्जाचे वाटप झाले आहे. येत्या सोमवार पर्यंत तालुक्‍याचा संपूर्ण लक्ष्यांक पूर्ण करण्याचे निर्देशही मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी दिले. 

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनिल देवरे, उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा, तहसिलदार चंद्रजित राजपूत, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, उपनिबंधक एस. व्ही. बदनाळे, जिल्हा बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश पिंगळे, बॅंकांचे अधिकारी उपस्थित होते. 
... 
 
 

https://scontent-frt3-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=ieHfRb3BmwcAX92Z_rl&_nc_ht=scontent-frt3-2.xx&oh=b81215d1826d3cdd00a98ff0d9504f7c&oe=5F840927

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com