नाशिकच्या बाजार समितीत झाला बळीराजा गौरवदिन ! - Baliraja Gauravdin celibration in nashik APMC | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

नाशिकच्या बाजार समितीत झाला बळीराजा गौरवदिन !

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020

शहरातील विविध पुरोगामी पक्ष-संघटनाकडून सोमवारी बलिप्रतिपदेच्या दिवशी "बळीराजा गौरव दिन" साजरा करण्यात आला. बहुजन-कष्टक-यांच्या सांस्कृतिक गौरवाचे प्रतिक म्हणून बहुजनांच्या नेणिवेत दफन झालेल्या बळीराजाच्या समतेच्या, आदर्श राज्याच्या संकल्पनेची कामना यानिमित्ताने करण्यात आली. 

नाशिक : शहरातील विविध पुरोगामी पक्ष-संघटनाकडून सोमवारी बलिप्रतिपदेच्या दिवशी "बळीराजा गौरव दिन" साजरा करण्यात आला. बहुजन-कष्टक-यांच्या सांस्कृतिक गौरवाचे प्रतिक म्हणून बहुजनांच्या नेणिवेत दफन झालेल्या बळीराजाच्या समतेच्या, आदर्श राज्याच्या संकल्पनेची कामना यानिमित्ताने करण्यात आली. 

यावेळी "संविधानप्रेमी नाशिककर"समितीच्या वतीने "बळीराजा गौरव दिन"  वेगळ्या पध्दतीने साजरा करण्यात आला. यानिमित्त रांगोळी काढण्यात आली होती. "संविधान जागर"हा विद्रोही गाण्यांचा  कार्यक्रम सादर करण्यात आला. बळीराजा गौरव दिन घराघरात साजरा व्हावा यासाठी शेतकरी, परिवर्तन वादी, संविधान प्रेमी नागरीकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन यावेळी परिवर्तन वादी साहित्यीक महादेव खुडे यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झालेल्या संविधान प्रेमी नाशिककरांच्या वतीने बळीराजा गौरव कार्यक्रमात केले. 

याप्रसंगी  अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती नाशिक जिल्ह्या वतीने येत्या २६, २७ नोव्हेंबरला केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी व कार्पोरेट कंपन्यांना धार्जिण्या नव्या कायद्याच्या विरोधात देशव्यापी बंद पुकारला आहे. त्याविषयी जनजागृती करण्यात आली. या प्रसंगी किसान सभेचे सुनील मालुसरे, क्रांतीवीर छावा सेनेचे करण गायकर, आम आदमी शेतकरी चे ऍड प्रभाकर वायचळे, किसान सभेचे  राजू देसले, राष्ट्र सेवा दल चे नितीन मते , राष्ट्रवादी चे रमेश औटे, सेनेचे मधुकर जाधव, जनआंदोलन च्या अनिता पगारे आदींनी मार्गदर्शन केले. 

घंटागाडी कर्मचा-याची मुलगीआरती कनोजे हिने बळीराजाची भव्य रांगोळी काढली होती. तिचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी अड नाजीम काझी, आसिफ शेख,  पद्माकर इंगळे,संतोष जाधव, सविता जाधव, तलाहा शेख, गोराणे, रामदास भोंग, किरण बोरसे, कावेरी,  नितीन शिराळकर, कैलास मोरे, शिवनाथ जाधव आदी उपस्थित होते.
...
 

https://developers.facebook.com/docs/plugins/embedded-posts/?prefill_hre...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख