कोरोनावरील उपचारासाठी रेमेडेसिव्हीरचा वापर टाळावा

कोरोनाचा रुग्ण बरा होण्यासाठी आवश्यक ती औषधे डॉक्टरांनी द्यावी, परंतु रेमडिसिव्हिरचा वापर आवश्यक असेल तरच करावा. शक्यतो त्याचा वापर टाळावा,असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
Namco
Namco

नाशिक : कोरोनाचा रुग्ण बरा होण्यासाठी आवश्यक ती औषधे डॉक्टरांनी द्यावी, परंतु रेमडिसिव्हिरचा वापर आवश्यक असेल तरच करावा. शक्यतो त्याचा वापर टाळावा, असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

येथील नामको रुग्णालय संचलित आर. एम. डी. कोविड केअर सेंटरचे उदघाटन श्री. भुजबळ यांच्या हस्ते झाले. यावेळी ते म्हणाले की, यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपटीने कोरोनाची रुग्णसंख्या वाढली. त्यामुळे औषधे व ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र आवश्यक सोयी सुविधा शासन, प्रशासन व सेवाभावी संस्था यांच्यामार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहर व जिल्ह्यात बेडची संख्या कमी होती. आपण ती मोठ्या प्रमाणात वाढविली आहे. वैद्यकीय क्षेत्रात ज्याला आवश्यक आहे त्याला प्राधान्याने मदत करून देण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. ऑक्सिजनचा साठा मुबलक प्रमाणात ठेऊन कोविड केअर सेंटरचे काम सुरू ठेवावे. आपल्या पूर्वजांनी मोठं कष्टाने सामाजिक कार्य सुरू केलं आहे ते अविरत सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे. लॉकडाऊनचा परिणाम अतिशय चांगला होत असून रुग्ण संख्या कमी होण्यास त्याचा अतिशय फायदा होत आहे. पुढची लाट येण्याच्या अगोदर आपण तयारी ठेवावी लागेल. कायमस्वरूपी व्यवस्था झाल्याने याचा भविष्यात देखील उपयोगी ठरणार आहे.

ऑक्सिजनसाठी मदत करू
यावेळी आमदार दिलीपराव बनकर म्हणाले की, नामको चॅरिटेबल हॉस्पिटल  व बँकेच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचे सामाजिक कार्य अविरतपणे सुरू आहे. कोरोनाच्या काळात ऑक्सिजन बाबत योग्य ते सहकार्य करण्यात येईल.

१०० खाटांचे रुग्णालय
नामको हॉस्पिटल गेल्या वीस वर्षापासुन उत्तर महाराष्ट्रात कॅन्सर निदान व उपचार धर्मार्थ दरात देत आहे. आज येथे १० बेडचा आय.सि.यु., ४ ऑपरेशन थिएटर, डायलिसीस सेंटरसह १०० बेडच्या रुग्णालयकरण्यात आले. यामध्ये कॅन्सरसह मेडिसीन, गायनॅक, पेडियाट्रिक, ऑर्थोपेडिक, सर्जरी, न्युरो, युरो, नाक, कान, घसा, फिजीओथेरपी असे सर्वच मल्टिस्पेशालिटी विभाग कार्यान्वित झाले. ५० पेक्षा जास्त तज्ञ डॉक्टर्स, ७० परीचारीका व इतर रुग्णसेवक असा जवळपास २०० कर्मचारी नामको हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे.

यावेळी आमदार दिलीपराव बनकर, नामको बँकेचे अध्यक्ष सोहनलालजी भंडारी, सचिव शशिकांतजी पारख, माजी आमदार वसंत गिते, विजय साने, हेमंत धात्रक, अशोक साखला, महेश लोढा, चंद्रकांत पारख, प्रकाश दायमा, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर जगताप, रंजन ठाकरे, राजेंद्र डोखळे, जयप्रकाश जातेगावकर, यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com