नाशिक : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखणे हा आपल्यापुढील सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. कोरोनाने होणारे मृत्यू चिंतेचा विषय आहे. त्यामुळे पोलिसांची वाट न बघता ग्रामसेवकांनी स्वतःच गर्दी होत असल्यास हस्तक्षेप करावा. लग्न, अंत्ययात्रेला गर्दी होऊ नये यासाठी प्रबोधन करा, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या महिला सभापती अश्विनी आहेर यांनी दिल्या.
कोरोना (कोविड) रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर शनिवारी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीची बैठक न्यायडोंगरी येथे सभापती आर्कि. आहेर यांच्या उपस्थितीत शनिवारी झाली. यावेळी त्या म्हणाल्या, नांदगाव तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात आली. सद्यस्थितीत नांदगाव , न्यायडोंगरी परिसरात मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधितांची आणि मृत्यूंत होणारी वाढ अत्यंत चिंताजनक आहे. आरोग्य यंत्रणेबरोबरच प्रत्येक नागरिकाने काळजी घ्यावी, विनाकारण व विना मास्क कोणीही बाहेर फिरू नये. बाधित रुंगणाच्या कुटुंबातील सर्व व्यक्तीनी स्वॅब देऊन चाचणी करुन घ्यावी.
आरोग्य यंत्रणेने मृत्यु होणार नाही याविषयी दक्ष राहण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. त्या म्हणाल्या, कोरोना विषयी लवकर निदान व उपचार झालेच पाहीजे. जनजागृतिवर भर दिला गेला पाहीजे. गावपातळीवर आसलेल्या कोरोना समितीने गावाच्या रक्षणासाठी योग्य पावले ऊचलली पाहीजे. सहकार्य न करणारे नागरिकांचे मतपरीवर्तन करा. जे ऐकणार नाहीत, त्यांच्या विषयी कायद्याचा बडगा ऊगारा. गावात बाजार, लग्न समारंभ व अंत्यविधीला गर्दी टाळा अशा सूचना दिल्या. सर्व ग्रामसेवक, आरोग्य अधिकारी, कर्मचारी , गटविकास अधिकारी यांनी सद्यस्थितीचा अहवाल सादर केला. त्याबाबत विविध सूचना देण्यात आल्या. शासकीय यंत्रणा, स्थानिक लोकप्रतिनीधी, ग्रामस्थ, नागरिकांनी सर्व नियम पाळून एकत्रित कामकाज केल्यास कोरोना संसर्ग कमी होऊन `कोविड`चे समुळ निर्मूलनास वेळ लागणार नाही, असा विश्वास अश्विनी आहेर यांनी व्यक्त केला.
https://scontent-frt3-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=SUfBPGFxRbgAX8LJZJy&_nc_ht=scontent-frt3-2.xx&oh=f2a348c5de994fb9c1982ce1dde8de1c&oe=5F782BA7
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.