नाशिकचे अवनखेड ठरले देशातील अव्वल गाव ! - Avankhed amongst first ten village in nation | Politics Marathi News - Sarkarnama

नाशिकचे अवनखेड ठरले देशातील अव्वल गाव !

संपत देवगिरे
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

आदर्श गाव उभारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केले होते. त्यानुसार माजी खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांनी अवनखेड (दिंडोरी) गावाची निवड केली होती. येथील उत्कृष्ट विकास कामांमुळे हे गाव देशातील पहिल्या दहा गावांत समाविष्ट झाले आहे.

नाशिक : आदर्श गाव उभारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केले होते. त्यानुसार माजी खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांनी अवनखेड (दिंडोरी) गावाची निवड केली होती. येथील उत्कृष्ट विकास कामांमुळे हे गाव देशातील पहिल्या दहा गावांत समाविष्ट झाले आहे. या गावातील विकासकामे सामान्यांच्या नजरेत भरणारी आहेत. 

मालगव्हाण (सुरगाना) या गावाची तीन वर्षापूर्वी निवड होऊनही येथे अद्याप एकही काम सुरु झालेले नाही. यासंदर्भात श्री. चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी या गावाचा उल्लेख करतांनाच अन्य गावांबाबत मात्र प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे संबंधींत कर्मचाऱ्यांची दखल घेऊन त्यावर योग्य कारवाई करावी. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सुचीत करावे, अशी विनंती त्यांनी केली आहे. 

पंतप्रधान मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात प्रत्येक खासदाराने आपल्या मतदारसंघातील एक गाव दत्तक घ्यावे. वर्षभरात त्याच्या विकासाचे नियोजन करुन पुढील वर्षी दुसऱ्या गावाची निवड करावी. त्यानुसारे देशातील विविध खासदारांनी गावे दत्त घेतली. त्यात माजी खासदार चव्हाण यांनी अवनखेड गाव दत्तक घेतले होते. तेथील पिण्याच्या पाण्याची योजना, शौचालय, ग्रामस्वच्छता, ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, अंतर्गत रस्ते आदी कामांचे नियोजन केले. त्याची कार्यवाही झाली. यातून अतिशय भव्य स्वरुपाचे प्रकल्प येथे साकारले आहे. त्यामुळे खासदार आदर्श ग्राम योजनेच्या पहिल्या टप्प्यात या गावाचा देशातील दहा आघाडीच्या गावांत समावेष झाला. त्यामुळे खासदार चव्हाण यांनी त्यांसंदर्भात केलेल्या सहकार्यासाठू गावातील ग्रामपंचायत सदस्य, सरपंच व नागिरकांचे कौतुक केले. 

अकार्यक्षम लोकांवर कारवाई 
याच पत्रात त्यांनी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात मालगव्हाण (ता. सुरगाणा) या गावाची निवड केली होती. त्यासंदर्भात विकासकामांचे नियोजन केले. प्रशासनाकडे त्याचे प्रस्ताव सादर झाले आहे. मात्र गेल्या तीन वर्षात त्याबाबत काहीही हालचाली झाल्या नाही. कोणतेच विकासकाम झालेले नाही. तीन वर्षे होऊनही एकही काम अद्याप सुरु झालेले नाही. याविषयी जिल्हाधिकाऱ्याकडे बैठक घेण्यात आली. संबंधीत अधिकाऱ्यांशी चर्चा होऊन त्यांचीही बैठक झाली. मात्र काहीच प्रगती झाली नाही. त्यामुळे या गावातील प्रस्तावित कामे तातडीने सुरु करण्यासाठी संबंधीतांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सुचीत करावे. मालगव्हाण हे आदिवासी बहुल गाव आहे. योजनेनुसार येथे एकही काम सुरु न झाल्याने ग्रामस्थांत नाराजी आहे. त्यामुळे या अकार्यक्षमतेची दखल घेतली जावे, असे आवाहन त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला केले आहे. 
...  

https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख