महापालिकेच्या रुग्णालयात ऑक्सिजन बेड करा  - Avail Oxygen beds in NMC Hospitals, Nashik politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

महापालिकेच्या रुग्णालयात ऑक्सिजन बेड करा 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 10 एप्रिल 2021

शहरात कोरोना संसर्गाचा वेग वाढत असल्याने गरीब रुग्णांना बेड मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्या अनुषंगाने प्रशासनाने नवीन बिटको व डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयातील संपूर्ण बेड ऑक्सिजनचे करावेत व सर्वसाधारण रुग्णांना ठक्कर डोम, संभाजी स्टेडिअम व मुक्तिधाम कोविड सेंटरमध्ये दाखल करावे.

नाशिक : शहरात कोरोना संसर्गाचा वेग वाढत असल्याने गरीब रुग्णांना बेड मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्या अनुषंगाने प्रशासनाने नवीन बिटको व डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयातील संपूर्ण बेड ऑक्सिजनचे करावेत व सर्वसाधारण रुग्णांना ठक्कर डोम, संभाजी स्टेडिअम व मुक्तिधाम कोविड सेंटरमध्ये दाखल करावे, अशी मागणी शिवसेनेचे महानगरप्रमुख, नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी केली.

नगरसेवक बडगुजर यांनी मापालिका आयुक्त कैलास जाधव यांची भेट घेतली. यासंदर्भात निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे, की कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी प्रत्येक रुग्णाला ऑक्सिजनची आवश्‍यकता भासणार नाही. एकूण रुग्णांपैकी ४० टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. त्या मुळे बिटको व झाकिर हुसेन रुग्णालयांमध्ये संपूर्ण ऑक्सिजन बेडची व्यवस्था करावी. जेणेकरून ऑक्सिजन बेडअभावी रुग्णांची हेळसांड होणार नाही. ठक्कर डोम, मुक्तिधाम किंवा संभाजी स्टेडियममध्ये कोविड सेंटर उभारून येथे सर्वसाधारण रुग्णांना दाखल करावे. महापालिकेकडे शासनाने रेमडेसिव्हिर मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिले आहेत. त्यांचा वापरही योग्य प्रमाणात होतो की नाही, याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, गरीब रुग्णांना औषधोपचार कमी पडणार नाहीत याची दक्षता घ्यावी. गरीब रुग्णांना रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठी भटकंती करावी लागणार नाही याबाबत प्रशासनाने काळजी घ्यावी. कोरोना नियंत्रणासाठी वैद्यकीय विभाग अधिक क्षमतेने कार्यरत होईल, यासाठी प्रशासनाने नियोजन करावे. 

नाशिक शहरात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. विविध प्रतिबंधात्मक उपाय केल्यानंतर देखील हा संसर्ग नियंत्रणात येण्याची चिन्हे नाहीत. उलट रोजच्या नव्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसते. त्यामुळे शहरातील शासकीय, महापालिका तसेच खाजगी असे सर्वच रुग्णालये फुल्ल आहेत. रुग्णांना दाखल करण्यासाठी जागा नसल्याने प्रचंड नाराजी आहे. त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. 
... 
महापालिका हद्दीत शहरातील रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याने प्रशासनाने सर्व रुग्णालयांना सूचित करावे व महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये वैद्यकीय स्टाफ कमी पडणार नाही, याची दक्षता घ्यावी. 
-सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख, शिवसेना  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख