आधी रुग्णांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करा !

रेमडेसिव्हिर इंजेक्शन, ऑक्सिजन उपलब्ध करून द्यावे, रमजानपर्व लक्षात घेता मुस्लिम बांधवांना आवश्यक सोयी-सुविधा त्यांच्या घराजवळ उपलब्ध करून द्याव्यात, रुग्णांमध्ये जनजागृती करावी.
Dada Bhuse
Dada Bhuse

मालेगाव : रेमडेसिव्हिर इंजेक्शन, ऑक्सिजन उपलब्ध करून द्यावे, रमजानपर्व लक्षात घेता मुस्लिम बांधवांना आवश्यक सोयी-सुविधा त्यांच्या घराजवळ उपलब्ध करून द्याव्यात, रुग्णांमध्ये जनजागृती करावी, सामान्य नागरिकांना वेळोवेळी माहिती उपलब्ध करून द्यावी, यांसह विविध सूचना येथील शासकीय विश्रामगृहावर झाल्यावर कोरोना आढावा सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आल्या.

कृषिमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. नागरिकांच्या सुविधांसाठी मोसम पूल परिसरात वॉररूम सुरू करून आरोग्य, पोलिस, महसूल, प्रशासन अधिकारी नियुक्त करावेत. खासगी डॉक्टरांच्या सेवा अधिग्रहीत कराव्यात. महापालिकेने सोशल मीडियावर रेमडेसिव्हिर इंजेक्शन, बेडची उपलब्धता यांची माहिती नागरिकांना उपलब्ध करून द्यावी असे आदेश श्री. भुसे यांनी दिले.

उपमहापौर नीलेश आहेर, सुरेश निकम, प्रसाद हिरे, राजेंद्र भोसले, प्रमोद शुक्ला, संजय दुसाने, रामा मिस्तरी, दिनेश ठाकरे, सुनील देवरे, देवा पाटील, दिलीप आहिरे, नीलेश पाटील, डॉ. खालीद परवेज, अस्लम अन्सारी, प्रमोद पाटील, भारत चव्हाण, नरेंद्र सोनवणे, भिकन शेळके, मनोज शहा, नितीन पोफळे, प्रांताधिकरी विजयानंद शर्मा, उपायुक्त नितीन कापडणीस उपस्थित होते.

बैठकीत रेमडेसिव्हिर इंजेक्शन, ऑक्सिजन तुटवडा यावर चर्चा झाली. शहर व तालुक्यासाठी जास्तीत जास्त इंजेक्शन व ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध व्हावेत. राजकारण न करता राजकीय मतभेद बाजूला ठेवून रुग्णास व जनतेस धीर द्या. कोरोना आजार उपचाराच्या माहितीसंदर्भात प्रशासनाने जनसंपर्क अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. रमजानसाठी आवश्‍यक सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी सूचना राजेंद्र भोसले यांनी केली. प्रशासनाला गरज वाटल्यास शैक्षणिक संस्थेच्या इमारती देऊ, असे श्री. हिरे यांनी सांगितले. डॉ. खालीद, श्री. पाटील, श्री. पोफळे, श्री. निकम, श्री. आहिरे, श्री. दुसाने आदींनी विविध सूचना मांडल्या.

गायकवाडांची अनुपस्थिती चर्चेचा विषय
शहर व परिसरात कोरोना संसर्ग काळात विविध उपक्रम राबविण्यात अग्रेसर असलेल्या भाजप गटनेते सुनील गायकवाड यांची अनुपस्थिती चर्चेची होती. भाजपचे महानगराध्यक्ष मदन गायकवाड यांनीही पालकमंत्री छगन भुजबळ यांना विशेष पत्र देऊन ‘तुम्ही तरी मालेगावकडे लक्ष द्या हो’ अशी विनंती केली आहे. पत्रात शहराची परिस्थिती गंभीर होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे..
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com