`सीएसआर`चा निधी कोरोनाच्या उपाययोजनांसाठी वापरावा

मोठ्या स्वरूपातील उद्योग व संस्था हे सामाजिक दायित्व (सीएसआर) म्हणून निधी उपलब्ध करून देत असतात. हा निधी उपलब्ध करून घेण्यासाठी त्यांच्या बैठका घेण्यात येवून, सीएसआरचा निधी कोरोनाच्या उपाययोजनांसाठी उपलब्ध करून देण्याचे आवाहन त्यांना करण्यात यावे, अशा सूचनाही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकारी यांना दिल्या आहेत.
Chhagan Bhujbal f
Chhagan Bhujbal f

नाशिक : मोठ्या स्वरूपातील उद्योग व संस्था हे सामाजिक दायित्व (सीएसआर) म्हणून निधी उपलब्ध करून देत असतात. (Big & medium industry Avail CSR funds) हा निधी उपलब्ध करून घेण्यासाठी त्यांच्या बैठका घेण्यात येवून, (to Avail this  funds for covid19 treatments Administration should arrange meetings) सीएसआरचा निधी कोरोनाच्या उपाययोजनांसाठी उपलब्ध करून देण्याचे आवाहन त्यांना करण्यात यावे, अशा सूचनाही पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी संबंधित अधिकारी यांना दिल्या आहेत.

आज जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात कोरोना सद्यस्थिती आणि कोरोना पश्चात आजारांबाबत आयोजीत आढावा बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले की, संभाव्य तिसऱ्या लाटेची  शक्यता, तसेच  डेल्टा प्लस, लॅम्बडा यासारखे कोरोनाचे नवे व्हेरीयंटचे संक्रमण लक्षात घेता कोरोना नियंत्रणाच्या उपाययोजनांसह उद्योगधंदे सुरू राहण्यासाठी  ऑक्सिजन साठ्याचे नियोजन करावे. 

ते म्हणाले की, औद्योगिक क्षेत्रात सुरू करण्यात आलेले उद्योग, कंपन्या संभाव्य तिसऱ्या लाटेत सुरू राहण्यासाठी त्यांना लागू करण्यात आलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन होणे गरजेचे आहे. त्याकरीता उद्योजकांनी कामगारांचे लसीकरण करून घ्यावे. तसेच त्यांच्या राहण्याची व्यवस्था तेथील जवळच्या परिसरात करण्यात यावी अथवा त्यांच्या प्रवासाची व्यवस्था करावी. यासर्व गोष्टींचे नियोजन उद्योजकांनी केले आहे किंवा कसे याबाबतची सविस्तर माहिती औद्योगिक क्षेत्राशी संबंधित अधिकाऱ्यांनी पुढील बैठकीत सादर करावी. त्याचप्रमाणे जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध होण्यासाठी मंजुर करण्यात आलेले सर्व ऑक्सिजन निर्मीती प्रकल्प तातडीने सुरू करण्याचे प्रयत्नपूर्वक नियोजन करण्यात यावे. 

ऑक्सिजन निर्मीती प्रकल्प प्रकल्प सुरू करण्यापूर्वी या प्रकल्पांमध्ये भविष्यात कोणत्याही अडचणी येणार नाहीत किंवा कमतरता राहणार नाही, यासाठी सर्व तांत्रिक बाबींची पुर्तता करावी, त्यांच्या गुणवत्तेची पडताळणी करणे गरजेचे आहे, असेही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.

शहरी भागातील कोरोना बाधितांच्या रुग्णसंख्येपेक्षा ग्रामीण भागातील रुग्णसंख्या काही प्रमाणात वाढलेली आहे, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ग्रामीणस्तरावर काम करणारे तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील यांच्या मदतीने नियोजन करण्यात यावे. याकरीता ग्रामीण भागात लग्न सोहळ्यांना परवानगी देते वेळी लग्न समारंभासाठी निर्धारीत केलेल्या उपस्थितांच्या संख्येचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. तसेच लग्नासाठी येणाऱ्या प्रत्येकाचे तापमान तपासणीसह त्यांना मास्कचा व सॅनिटायझरचा वापर करणे अनिवार्य करण्यात यावे. त्यानुसार ग्रामीण भागात गर्दी होणार यासाठी नियोजन करण्यात यावे, कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक करण्यात यावी, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या. 

ते पुढे म्हणाले, लसीकरण वाढविण्यासाठी नियोजन करण्यात यावे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळावा, त्यातून कोणीही गरजु वंचित राहणार नाही, यासाठी संबंधित यंत्रणांनी लक्ष द्यावे. 

बैठकीत महानगरपालिका आयुक्त, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस यंत्रणा तसेच आरोग्य विभागामार्फत करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती पालकमंत्री यांना सादर केली.    

यावेळी महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दिपक पांडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण अष्टीकर, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, निलेश श्रींगी, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अरविंद नरसिकर, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, म्युकर मायकोसिस टास्क फोर्सचे डॉ. संजय गांगुर्डे, लसीकरण नोडल अधिकारी डॉ. रवींद्र चौधरी आदी उपस्थित होते.
...

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com