`राष्ट्रवादी`चे नेते विक्रम कोठुळे यांच्या घरावर हल्ला!

येथील रराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि शहर शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विक्रम कोठुळे यांच्या घरावर गुंडांनी दगडफेक करूत घरावर हल्ला केला. हे सर्व गुंड सराईत असून त्यांनी सशस्त्र हल्ला करीत परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
Vikram Kothule F
Vikram Kothule F


नाशिक : येथील रराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि शहर शिवजयंती उत्सव समितीचे (NCP leader and Shivjayanti committee Chairmen) अध्यक्ष विक्रम कोठुळे (Vikram Kothule) यांच्या घरावर गुंडांनी दगडफेक करूत घरावर हल्ला केला. (Stone pelting & Attacked on House) हे सर्व गुंड सराईत असून त्यांनी सशस्त्र हल्ला करीत परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.  

या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या दहशतीमुळे नाशिक रोडला काही काळ तणावाचे वातावरण होते. वाढत्या गुंडगिरीचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी उपनगर पोलिसांची भेट घेतली.  हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी अशी मागणी पोलिसांकडे करण्यात आली. 

उपनगर पोलिस ठाण्यात विक्रम कोठुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी याबाबत तातडीने तपास सुरु केल्यावर संबंधीत हल्लेखोरांचे वाहन सापडले. मात्र ते फरार झाले आहेत. 

श्री.  कोठुळे विहितगाव येथील मरीमाता मंदिरासमोरील सुंदराई निवास येथे राहतात. रात्री साडेअकराला कोठुळे यांच्या घरासमोर कार (एमएच १५, एके १०८६) थांबली. त्यातून प्रशांत बागूल (रा. बागूलनगर), विक्रम गवळी (रा. विहितगाव बुद्धविहाराजवळ), राहुल बनकर (रा. बागूलनगर), विकी हांडोरे (रा. प्राइड सोसायटी, विहितगाव नाका) उतरले. विक्रम कोठुळे यांच्या घरावर दगड फेकले. ते सर्व जण विक्रम कोठुळे यांच्या नावाने शिवीगाळ करून, ‘तू बाहेर ये, तुझ्याकडे बघायचे आहे,’ असे म्हणून निघून गेले. थोड्या वेळाने कोठुळे घराबाहेर आले असता, पुन्हा चौघे संशयित कारमधून आले. त्यांच्या हातात कोयते होते. बळजबरीने त्यांनी कोठुळे यांच्या बंगल्याचे गेट उघडून दहशत माजविली. काही जण घरात घुसले. विक्रम यांच्या आई व पत्नीने संशयितांना बाहेर काढले. संशयितांनी कोठुळे यांच्या घरावर दगड फेकून दहशत माजविली. 

कोठुळे यांनी उपनगर पोलिसांना भ्रमणध्वनीवरून घटनेची माहिती दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, निवृत्ती अरिंगळे, मनोहर कोरडे, मिलिंद पगारे आदींनी उपनगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांची भेट घेऊन कोठुळे यांच्या घरावर हल्ला करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.

हा हल्ला करण्याचा उद्देश समजून आला नाही. मात्र श्री. कोठुळे नुकत्याच झालेल्या व शहरात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. या समितीमार्फत विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले होते. त्यामुळे या हल्ल्याबाबत नागिरकांनी नाराजी व्यक्त केली असून संबंधींताना तातडीने अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. 
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com