भाजप नगरसेवकाचे कार्यालय फोडण्याचे रहस्य उलगडेना!

भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक विशाल संगमनेरे यांच्या संपर्क कार्यालयाची काल त्यांच्या स्थानिक विरोधक कार्यकर्त्यांनी मोडतोड केली. गेले तीन दिवस या भागात दोन गटात वाद उफाळून आला आहे.
Vishal 123
Vishal 123

नाशिक रोड : भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक विशाल संगमनेरे यांच्या संपर्क कार्यालयाची काल त्यांच्या स्थानिक विरोधक कार्यकर्त्यांनी मोडतोड केली. (local opposition workers attack BJP Corporator Vishal Sangamnere`s Office) गेले तीन दिवस या भागात दोन गटात वाद उफाळून आला आहे. एका पोलिसाला झालेली बेदम मारहाण (Gangs of 15 member attack on Police) आणि त्यानंतर कार्यालयाची तोडफोडीचे याचा संबंध आहे काय?, (people are in fear) या रहस्यात पोलिसांची काय भूमिका आहे, याचीच चर्चा आहे. 

पंचक येथील भाजप नगरसेवक संगमनेरे यांच्या संपर्क कार्यालयावर टोळक्याने दगडफेक केली. याप्रकरणी दहा जणांविरुद्ध नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. हृषीकेश ऊर्फ तात्या चौधरी, सचिन डांगे, अमोल बोराडे, आदित्य बोराडे, निखिल बोराडे (रा. सर्व बोराडे मळा, जेल रोड) व त्यांचे पाच अनोळखी साथीदार, अशी संशयितांची नावे आहेत. 

याप्रकरणी सुनील धोंगडे (रा. नांदूर गाव) यांनी तक्रार दाखल केली. धोंगडे शुक्रवारी सायंकाळी नगरसेवक विशाल संगमनेरे यांच्या कार्यालयात कामानिमित्त जात असताना ही घटना घडली. दुचाकीवर डबलसिट आलेल्या टोळक्याने हा हल्ला केला. नगरसेवक संगमनेरे कार्यालयात नसताना संशयितांनी त्यांना शिवीगाळ करीत कार्यालयावर दगडफेक केली. तसेच, कार्यालयास लावलेला बोर्ड काठ्यांनी फाडला. संशयितांनी संगमनेरे भेटला तर सोडणार नाही, अशी धमकी देऊन फरारी झाल्याचे म्हटले आहे.  

नगरसेवक संगमनेरे या प्रभागातील निवासी नाहीत. मात्र भारतीय जनता पक्षाने आयात केलेल्या कार्यकर्त्यांत त्यांचा समावेष होतो. बहुसदस्यीय प्रभागातून ते विजयी झाले. तेव्हापासूनच स्थानिक कार्यकर्ते, नागरिक त्यांच्याबाबत नाराज होते. यातून स्थानिक विरोधात सातत्याने श्री. संगमनेरे यांच्याशी वाद घालत असतात. त्यातून यापूर्वीही बाचाबाची झाली आहे. दोन दिवसांपूर्वी एका पोलिस कर्मचाऱ्याला त्याच्या घरोसमोरच पंधरा-वीस जणांनी बेदम मारहाण केली होती. त्यामागे नगरसेवक संगमनेरे यांचे विरोधक हेच टार्गेट होते असे बोलले जाते. ही मारहाणच संगमनेरे यांच्या कार्यालयावरील हल्ल्याचे निमित्त ठरल्याची चर्चा आहे. 

`तो` पोलिस कुठे आहे?
दरम्यान दोन गटांच्या या वादात मारहाण झालेल्या पोलिसाने जखमी झाल्यानंतरही अद्याप तक्रार केलेली नाही. नाशिक रोड पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या या कर्मचाऱ्याला पोलिस ठाण्याचे प्रमुख म्हणून पोलिस निरिक्षकांनीही वाऱ्यावर सोडले की काय अशी चर्चा आहे. जर मारहाण झाल्यावर पोलिसच तक्रार देत नसतील तर सामान्यांनी दाद कुठे मागावी?. यामध्ये संबंधीत पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी या विषयावर बोलणे टाळले. त्यामुळे या प्रकरणात पोलिसच चर्चेचे केंद्र बनले आहे.  
...

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com