विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ कोरोनाग्रस्त !

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आज त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यासंदर्भात श्री. झिरवाळ यांच्याकडून दुजोरा देण्यात आला आहे.
विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ कोरोनाग्रस्त !

नाशिक : विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आज त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यासंदर्भात श्री. झिरवाळ यांच्याकडून दुजोरा देण्यात आला आहे. माझी प्रकृती चांगली आहे, संपर्कात आलेल्या कार्यकर्ते, नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून आपली चाचणी करावी असे आवाहन त्यांनी केले आहे. 

श्री. झिरवाळ यांना गेले दोन तीन दिवस बरे वाटत नव्हते. त्यामुळे शुक्रवारी दुपारी त्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोनाची चाचणी केली. त्याचा अहवाल आज सकाळी प्राप्त झाला. अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल होण्याच्या सूचना जिल्हा शल्य चिकीत्सकांनी दिल्या. कोरोनाचा संसर्ग आता सर्वच स्तरातील नागरिकांना होत आहे.त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रम तसेच गर्दीच्या ठिकाणी वावर टाळावा. मास्क घालूनच नागरिकांना भेटावे, शारीरीक अंतर पाळावे अशा सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केल्या आहेत. 

श्री. झिरवाळ आपल्या दिंडोरी- पेठ विधानसभा मतदारसंघातील नागरिकांशी नियमित संपर्कात आहे. रोज त्यांना विविध नागरिक आपल्या अडचणी घेऊन भेटतात. स्वतः श्री. झिरवाळ देखील विविध कार्यक्रम व दौरे करीत आहेत. त्यांच्या नियमीत कामात कोणताही खंड पडलेला नव्हता. या संपर्कातून त्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला असावा अशी शंका आहे. गेल्या सहा महिन्यांपासून देशभरात कोरोनाचा संसर्ग सुरु आहे. गेल्या महिन्याभरापासून त्यात वाढ झाली आहे. विशेषतः नाशिक जिल्ह्यात व शहरात संसर्ग मोठ्या प्रमाणात आहे. जिल्ह्यातील पाच आमदारांसह खासदारांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आमदार सरोज अहिरे, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार डॉ. राहूल आहेर, आमदार नरेंद्र दराडे, खासदार हेमंत गोडसे यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी देखील पॉझिटिव्ह आढळले होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर स्वतःहून क्वारंटाईन झाले होते. आता खुद्द विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनाही संसर्ग झाल्याने राजकीय कार्यकर्त्यांत तो चर्चेचा विषय बनला आहे. झिरवाळ यांचे कुटुंबिय देखील खबरदारीचा उपाय म्हणून रविवारी कोरोनाची चाचणी करुन घेणार आहे. 
... 
 

https://scontent-sin6-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=IJjfSVQdRK0AX9iJte7&_nc_ht=scontent-sin6-2.xx&oh=b3a3638765e5e2c1bcf8e866e8e8a02d&oe=5F93DB27

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com