राज्यातील आशा कर्मचारी संप मिटण्याची शक्यता मावळली

राज्यात आशा कर्मचारी व गटप्रवर्तक यांचा १५ जून पासून संप सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत कृती समितीच्या नेत्यांची आज मंत्रालयात बैठक झाली. मात्र त्यात कोणताही ठोस तोडगा निघाला नाही. त्यामुळे हा संप सुरुच राहणार आहे.
Asha
Asha

मुंबई : राज्यात आशा कर्मचारी व गटप्रवर्तक यांचा १५ जून पासून संप सुरू आहे. (ASHA workers strike is on From 15 june in State) या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांच्या उपस्थितीत कृती समितीच्या नेत्यांची आज मंत्रालयात बैठक झाली. (no solution in Mantralay Meeting) मात्र त्यात कोणताही ठोस तोडगा निघाला नाही. त्यामुळे हा संप सुरुच राहणार आहे. 

आशा व गटप्रवर्तक कोरोना महामारीच्या काळात स्वतःच्या जीवावर उदार होऊन अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करीत आहेत. ते दररोज सात आठ तास काम करतात. त्यांना अत्यंत कमी वेतनावर राबवून घेतले जाते. त्यांना जगण्यासाठी किमान वेतन द्यावे, कोरोना संबंधित कामाच्या मोबदल्यामध्ये वाढ करावी. कोरोना संबंधित काम करण्यासाठी तीनशे रुपये प्रतिदिन याप्रमाणे विशेष भत्ता राज्यभर आशा कर्मचारी व गटप्रवर्तकांना द्यावा. आरोग्य खात्याच्या नोकर भरतीत आशा कर्मचारी व गटप्रवर्तक यांना प्राधान्य देण्यात यावे, आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्रमाणेच गटप्रवर्तक यांचे सुसूत्रीकरण करावे. आदी मागण्या यावेळी आरोग्यमं६्यांकडे करण्यात आल्या.

राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट असून आता कोणताही आर्थिक बोजा सहन करण्याची सरकारची परिस्थिती नाही. त्यामुळे आशा कर्मचाऱ्यांना किमान वेतन देणे शक्य नाही व कोरोना संबंधित मोबदल्यात वाढ करणे शक्य नाही असे श्री. टोपे यांनी चर्चेदरम्यान सांगितले.

संप मिटवण्याकरता कोणताही प्रस्ताव त्यांनी कृती समितीच्या नेत्यांसमोर मांडला नाही, त्यामुळे वरील मागण्यांसाठी बेमुदत संप यापुढेही चालू ठेवण्याचा निर्णय कृती समितीने घेतला आहे.

आज राजेश टोपे यांच्या दालनात झालेल्या बैठकीत आरोग्य सचिव श्री व्यास, आयुक्त रामस्वामी, आशा कर्मचारी व गटप्रवर्तक कृती समितीचे नेते एम. ए. पाटील, डॉक्टर डी. एल. कराड, राजू देसले, श्रीमंत घोडके, श्री. इराणी, शंकर पुजारी, सुवर्णा कांबळे आदी उपस्थित होते.
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com