शरद पवारांच्या भेटीनंतर आशा कर्मचाऱ्यांचा संप मागे 

आशा वर्कर्स कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत आज कृति समितीचे अध्यक्ष एम. ए. पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेतली. यावेळी कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्यांबाबत लवकरच समाधानकारक तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन मिळाल्याने संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Sharad Pawar Asha workers
Sharad Pawar Asha workers

नाशिक : आशा वर्कर्स कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत आज कृति समितीचे अध्यक्ष एम. ए. पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार (ASHA workers Action committee leader M. A. Patil meets Sharad Pawar) आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेतली. यावेळी कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्यांबाबत लवकरच (Soon will find solution for deemands)समाधानकारक तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन मिळाल्याने संप मागे (Strike roll back) घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोशल मीडियावर माहिती दिली. विविध मागण्यांसाठी राज्यातील आशा वर्कर्स व गटप्रवर्तक कर्मचारी १५ जूनपासून संपावर होते. यासंदर्भात समितीच्या नेत्यांनी आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांची विविध मागण्यांवर चर्चा झाली. श्री. पवार यांनी त्यांना सूचना केल्या. 

माफक किमान वेतन आणि कोरोना काळातील कामाचा योग्य भत्ता मिळावा यासाठी आशा वर्कर्स व गटप्रवर्तकांनी बेमुदत संप पुकारला आहे. तो आता लवकरच मागे घेतला जाणार आहे. कोरोना महामारीच्या कठीण काळात हा संप लवकरात लवकर मिटावा यासाठी महाराष्ट्र राज्य आशा-गटप्रवर्तक कर्मचारी कृति समितीचे अध्यक्ष एम. ए. पाटील यांची आज श्रीय टोपे यांनी भेट घेतली. 

श्री. पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा करून आशा वर्कर्स व गटप्रवर्तकांचे म्हणणे जाणून घेतले. यासंदर्भात चर्चा करून वेतनवाढीबाबत समाधानकारक तोडगा काढण्यात येईल. या चर्चेनंतर श्री. पाटील यांनी संप मागे घेण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. संप मिटवण्याबाबत केलेल्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्य आशा-गटप्रवर्तक कर्मचारी कृति समितीचे श्री. टोपे यांनी आभार व्यक्त केले. 
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com