अमृता पवारांनी घरीच बनवला शाडू मातीचा गणपती !  - Arc. Amruta Pawar made a shadu clave Ganesha idol | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सरपंचपदाचे आरक्षण नव्यानेच होणार आणि प्रशासकांच्या कारभाराची चौकशीही होणार

अमृता पवारांनी घरीच बनवला शाडू मातीचा गणपती ! 

संपत देवगिरे
रविवार, 23 ऑगस्ट 2020

कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत आहे. या काळात आपल्याला प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष काही संदेश देखील मिळत आहेत. त्यामुळे कोरोनाला हरवायचे असेल, तर घरीच रहा. घरातच बसा. स्वतः घरीच गणपती बनवा. घरातच त्याचे विधीवत विसर्जन करा. यातून पर्यावरण संवर्धन व जतन करा.

नाशिक : कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत आहे. या काळात आपल्या प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष काही संदेश देखील मिळत आहेत. त्यामुळे कोरोनाला हरवायचे असेल, तर घरीच रहा. घरातच बसा. स्वतः घरीच गणपती बनवा. घरातच त्याचे विधीवत विसर्जन करा. यातून पर्यावरण संवर्धन व जतन करा. आजवर पर्यावरणाला जी हानी पोहोचली आहे, ती थांबवा, असा संदेश देत येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या, आर्कीटेक्‍ट अमृता पवार व त्यांच्या कुटंबीयांनी स्वतः घरीच तयार केलेल्या गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे. 

यंदा कोरोनाचा संसर्ग असल्याने सार्वजनिक व कौटुंबिक दोन्ही गणपतींची संख्या कमी झाली आहे. सार्वजनिक गणेशोत्सवावर काही मर्यादा आल्या आहेत. पर्यावरणपुरक उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले जात आहे. त्याला प्रतिसाद देत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्या, आर्कीटेक्‍ट अमृता पवार व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी घरीच शाडू मातीचा सुबक व देखणी गणपतीची मूर्ती तयार केली आहे.

यासाठी त्यांच्या वहिनी धनश्री प्रणव पवार, पुतणी कस्तुरी प्रणव पवार यांनी शाडू मातीचा गणपती कसा बनवावा या तीन दिवसांच्या ऑनलाईन कार्यक्रमात भाग घेतला. तसा प्रयत्न त्यांनी गतवर्षीही केला होता. मात्र त्यात अपेक्षीत यश आले नव्हते. यंदा मात्र त्यांनी परिश्रमपुर्वक मूर्ती तयार केली. शाडू माती कालवून मूर्ती तयार करण्यात धनश्री यांनी विशेष प्रयत्न केले. रंगकाम स्वतः आर्कीटेक्‍ट अमृता पवार यांनी तर अलंकार व सजावटीचे काम कस्तुरीने केले. स्वतः बनविलेल्या या मूर्तीची प्रतिष्ठापणा करतांना त्यांचा आनंद, उत्साह काही औरच होता. त्यात मूर्ती तयार केली हे समाधान मोठे होते. 

यासंदर्भात अमृता पवार म्हणाल्या, कोरोनाचा संदेश आहे, घरीच थांबा. सरकार, प्रशासनानेही तसेच आवाहन केले आहे. अनेकांनी त्याचे पालन केले आहे. घरीच थांबा. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा. घरातच बसा व सुरक्षीत रहा. याचा दुसरा अर्थ अनावश्‍यक गर्दी, सार्वजनिक ठिकाणी होणारे प्रचंड गर्दीचे उपक्रम नियंत्रीत स्वरुपात साजरे करा. कारण दहा दिवसांचा गणेशोत्सव ही आपली परंपरा व उत्सव आहे. मात्र आता त्यातून पर्यावरणाला जी हानी पोहोचत आहे, त्याची जाणीव प्रत्येक शिक्षीत नागरिकाला झाली पाहिजे. पर्यावरणाचे जतन, संवर्धन हे आपले कर्तव्य आहे. म्हणूनच आम्ही हा उपक्रम केला. त्यात मिळालेले समाधान, आनंद नेहेमीपेक्षा अधिक आहे. कारण स्वतः केलेल्या मूर्तीचे प्रतिष्ठापणा, पूजन याचे समाधान नेहेमीपेक्षा जास्त आहे. प्रत्येकाने ते करावे. 
... 

https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख