केदा आहेरांना धक्का : जिल्हा बँकेवर प्रशासकाची नियुक्ती

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर मंगळवार (ता. २३ मार्च) त्रिसदस्यीय प्रशासक मंडळ नियुक्त झाले.
 Appointment of Administrator at Nashik District Bank .jpg
Appointment of Administrator at Nashik District Bank .jpg

नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर मंगळवार (ता. २३ मार्च) त्रिसदस्यीय प्रशासक मंडळ नियुक्त झाले. पदच्युत अध्यक्ष केदा आहेर यांनी काल एक आठवडा मुदतवाढ मागितली होती. त्यावर उच्च न्यायालयात सुनावणी झालीच नाही. 

सहकार विभागाने काल नाशिक जिल्हा बँकेचा कार्यभार समितीने घ्यावा असे आदेश काढले होते. त्यानुसार आज एसआरए प्रकल्पाचे एम. ए. आरिफ, पुण्याचे सह निबंधक चंद्रशेखर बारी यांनी बँकेत येऊन कार्यभार घेतला. तिसरे सदस्य तुषार पगार यावेळी उपस्थित नव्हते. मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयाने बॅंकेच्या सत्ताधारी आमदार, माजी खासदारांना मोठा राजकीय धक्का बसला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी आपला पदभार येत्या सात दिवसांत प्रशासकांकडे देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी आहे. मात्र, प्रतिवादींतर्फे सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्यात आला होता.

नाबार्ड बॅंकेने 2018 मध्ये कलम 110 अ अन्वये बॅंकेतील अनियमिततांमुळे केलेल्या चौकशीनंतर प्रशासकांची नियुक्ती केली होती. त्याला बॅंकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका क्र. 2301 द्वारे आव्हान दिले होते. यासंदर्भात राज्य सरकारने घेतलेली भूमिका व अन्य कारणांमुळे न्यायालयाने स्थगिती दिली होती. त्यानंतर या खटल्याची नियमित सुनावणी लांबत गेली. त्यामुळे गेले तीन वर्षे हा खटला सुरुच होता. दोन दिवसांपूर्वी या खटल्याची सुनावणी झाली. त्यात नाबार्डचा प्रशासक नियुक्तीचा आदेश कायमकरण्यात आला. तो रद्द करण्याची आहेर यांची याचिका न्यायमूर्ती व्ही. जी. बिष्ट आणि आर. डी. धनुका यांच्या खंडपीठाने फेटाळली. 

बॅंकेशी संबंधीत याचिका क्र. 271 (2019) आणि 1275 (2018) या देखील निकाली निघाल्या. या निकालात सात दिवसांत अध्यक्षपदाचा कार्यभार सहकार विभागाच्या उपनिबंधकांना सुपुर्द करायचा आहे. त्यामुळे या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागीतली तरी त्यात प्रतिवादींचा युक्तीवाद झाल्यानंतरच निर्णय होणार आहे. त्यात किमान एक सुनावणी होईल. अद्याप सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आलेली नाही. उच्च न्यायालयात केलेला विनंती अर्जची सुनावणी राहीली. त्यामुळे केदा आहेर यांच्या अध्यक्षपदाचा मार्ग बंद झाला.

या खटल्यात बॅंकेचे अध्यक्ष केदा आहेर (देवळा), उपाध्यक्ष आमदार सुहास कांदे (नांदगाव), संचालक आमदार दिलीप बनकर, आमदार नरेंद्र दराडे, आमदार किशोर दराडे (येवला), आमदार माणिकराव कोकाटे (सिन्नर), आमदार सीमा हिरे (नाशिक), माजी खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण, माजी आमदार अनिल कदम (निफाड), धनंजय पवार (कळवण), जीवा पांडू गावित (सुरगाणा), गणपत पाटील (दिंडोरी), शिवाजी चुंभळे (नाशिक), सचिन सावंत (बागलाण), परवेझ कोकणी (त्र्यंबकेश्‍वर), माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, शिरीषकुमार कोतवाल (चांदवड), नामदेव हलकंदर (पेठ), संदीप गुळवे (इगतपुरी) या एकोणीस संचालकांवर कारवाई झाली आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com