कामगारांशी संबंधीत मंडळांवर लोकप्रतिनिधी, कामगारांना नियुक्त करा

राज्यातील कामगारांच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या बैठकीत चर्चा झाली.
कामगारांशी संबंधीत मंडळांवर लोकप्रतिनिधी, कामगारांना नियुक्त करा

नाशिक : राज्यातील कामगारांच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या बैठकीत चर्चा झाली. यावेळी श्री. पवार यांनी कामगारांशी संबंधीत मंडळांवर लोकप्रतिनिधी, कामगार व मालकांचे प्रतिनिधी नियुक्त करा, अशी सुचना केली.  

यावेळी कामगारांच्या मागण्या, सुचना व प्रश्नांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वसान श्री. पवार आणि कामगार मंत्री  वळसे पाटील यांनी दिल्याचे कृती समीतीचे नेते डॅा डि. एल. कराड यांनी सांगितले

महाराष्ट्र राज्य कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या शिष्टमंडळाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्यालयात श्री. पवार यांच्याशी कामगारांच्या प्रश्नाबाबत चर्चा केली. यावेळी राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. असंघटित कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ, बांधकाम कामगारांना आर्थिक सहाय्य, घर कामगारांची नोंदणी व त्यांच्या योजना, यंत्रमाग-ऊसतोड कामगार- रिक्षाचालक व हाकर्स यांच्यासाठी मंडळाची स्थापना करणे, स्थलांतरित कामगार कायद्याची अंमलबजावणी करणे, कामगार विषयक त्रिपक्षीय समित्यांचे गठण, केंद्र सरकारचे कामगार विरोधी धोरण आदी विषयावर विस्ताराने चर्चा झाली. कृती समितीच्या वतीने डॉक्टर कराड, विश्वास श्री. उटगी, संजय वढावकर, एम. ए. पाटील, दिवाकर दळवी यांनी कामगारांच्या समस्या मांडल्या. 

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर कामगार विषयक त्रिपक्षीय समित्या गठीत केलेल्या नाहीत. त्यामुळे राज्य कामगार सल्लागार मंडळ, किमान वेतन समिती यासह माथाडी मंडळ, सुरक्षा रक्षक मंडळ, बांधकाम कामगार कल्याण मंडळ , घर कामगार कल्याण मंडळ ही सर्व मंडळे सध्या अधिकाऱ्यामार्फत चालविली जात आहेत. कृती समितीने या मंडळाचे गठन करून त्यावर लोकप्रतिनिधी, मालक व कामगार संघटनांचे प्रतिनिधी नियुक्त करावेत. त्यामुळे योग्य निर्णय प्रक्रीयेला गती येईल, अशी सुचना केली. याबाबत लवकर कारवाई करून मंडळांवर कामगार संघटनांचे प्रतिनिधी नियुक्त करण्याबाबत श्री. पवार यांनी कामगार मंत्र्यांना सुचविले.

लॅाकडाऊन झाल्याने कामगारांचे प्रश्न तीव्र झाले आहेत. कामगार कपात, वेतन कपात होत आहे. अशा परिस्थितीत कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी मंत्र्यांनी राज्यात जिल्हानिहाय दौरे करून कामगारांना दिलासा द्यावा, अशीही मागणी शिष्टमंडळाने केली . याबाबत लवकरच निर्णय करण्यात येईल असे मंत्र्यांनी सांगितले. या चर्चेविषयी कृती समितीने सामधान व्यक्त केले. 
....
 

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=_qv_SXSxylAAX-ecfgc&_nc_ht=scontent.fpnq6-1.fna&oh=55f65ec77fd589579b5f0b10593e87b6&oe=5F5C7C27

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com