'कोरोना’ बाधितांच्या ऑक्सीजनसाठी दानशूरांना आवाहन...

रूग्णालयात ऑक्सीजन नळ्या बसविण्यासाठी पैसे नसल्यामुळे शासकीय अधिकारी लेखी पत्र काढून दान करण्याचे आवाहन दानशूर व्यक्ती व लोकप्रतिनिधीना करीत आहेत.
Corona Fear.jpg
Corona Fear.jpg

जळगाव : ‘कोरोना’विरूध्द लढय्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी घोषणा केंद्र व राज्य सरकारतर्फे करण्यात येत आहे. परंतु दुसरीकडे रूग्णालयात ऑक्सीजन नळ्या बसविण्यासाठी पैसे नसल्यामुळे शासकीय अधिकारी लेखी पत्र काढून दान करण्याचे आवाहन दानशूर व्यक्ती व लोकप्रतिनिधीना करीत आहेत. त्यामुळे जनतेमधून आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील तहसलसिलदार व उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी ‘जाहीर आवाहन’ म्हणून संयुक्तरित्या पत्रक प्रसिध्द केले आहे. त्यांत त्यांनी म्हटले आहे, कि जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनुसार मुक्ताईनगर तालुक्यातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संघटना, सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधी, कार्यकर्त जनतेस आवाहन करण्यात येत आहे. 

‘कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर उपजिल्हा रूग्णालय मुक्ताईनगर येथे रूग्णाकरीता ऑक्सीजन पाईपलाईनचे काम करावयाचे आहे. या कामाकरीता सढळ हस्ते मदत करावी, जेणे करून तालुक्यातील कोरोनाबाधित रूग्णांवर मुक्ताईनगर येथेच उपचार करून आपआपल्या तालुक्यातील कोरोनामुक्तीचा लढा यशस्वी करण्यात आपले योगदान राहील. त्यावर मुक्ताईनगर उपजिल्हा वैद्यकीय अधिकारी व तहसीलदार यांचे पद आहेत. परंतु नाव नाही, तर त्यावर केवळ तहसिलदार कार्यालयाचा शिक्का उमटविण्यात आला आहे.

दोन्ही अधिकाऱ्यांची तालुक्यातील रूग्णांसाठी असलेली तळमळ दिसून येत आहे. मात्र सरकारच्या ढिसाळ कारभाराचे चित्रही दिसून येत आहे. केंद्र व राज्य सरकारतर्फे जर ‘कोविड’लढ्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध असल्याचे सांगण्यात येत आहे. मग मुक्ताईनगर तालुक्यातील उपजिल्हा रूग्णालयात कोविड रूग्णासाठी ऑक्सीजन पाईपलाईनसाठी निधी का उपलब्ध केला जात नाही. आज जिल्ह्यात कोविड रूग्णांची संख्या वाढत आहे. अशा स्थितीत जर ग्रामीण भागात जर रूग्णांवर चांगल्या प्रकारे उपचार झाले तर निश्‍चितच रूग्णांचा जीव वाचेल. 

मुक्ताईनगर आज जळगाव जिल्ह्याच्या एका टोकाला आहे. त्या ठिकाणाहून जळगावला रूग्ण आणणे आजच्या स्थितीत कठीण आहे. अशा वेळी त्या ठिकाणचे अधिकारीच जर स्वत;हून पुढे येवून उपचाराची सुविधा करीत असतील सरकारतर्फे त्या ठिकाणी निधी का उपलब्ध केला जात नाही असा प्रश्‍नही आता निर्माण झाला आहे. ‘कोविड’लढयासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी जिल्ह्यांना उपलब्ध केला जात असल्याचे सांगितले जात आहे. मग निधी नेमका कुठे जात आहे.

या प्रश्‍नाचे उत्तरही जिल्हाप्रशासनाने देण्याची गरज आहे. दोन्ही अधिकाऱ्यांनी जर खरोखरच आवाहन केले असेल तर स्थानिक लोकप्रतिनिधी, दानशूर व्यक्ती, नागरिक यांनी साध द्यायलाच हवी. त्यामुळे त्या ठिकाणी ऑक्सीजनची सुविधा झाली तर रूग्णांवर निश्चित उपचार होतील. मात्र, सरकारनेही ताबडतोब लक्ष देवून दानशूरांच्या भरवश्‍यावर न राहता या उपजिल्हा रूग्णालयास निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. 

 Edited  by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com