परदेशातील कांदा बाजार समितीत विक्रीला येतोच कसा? - APMC Shall not sell Imported onion | Politics Marathi News - Sarkarnama

परदेशातील कांदा बाजार समितीत विक्रीला येतोच कसा?

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020

परदेशातून कांदा भारतात येऊ शकतो. आयात करता येऊ शकतो. मात्र हा परेदशी कांदा बाजार समित्यांत विक्री कसा केला जातो. या बाजार समित्या शेतक-यांच्या आहेत. हे लक्षात ठेवले पाहिजे, या शब्दात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी बाजार समित्यांना कानपिचक्या दिल्या.  

धखनाशिक : परदेशातून कांदा भारतात येऊ शकतो. आयात करता येऊ शकतो. मात्र हा परेदशी कांदा बाजार समित्यांत विक्री कसा केला जातो. या बाजार समित्या शेतक-यांच्या आहेत. हे लक्षात ठेवले पाहिजे, या शब्दात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी बाजार समित्यांना कानपिचक्या दिलाय आहेत. 

जिल्ह्यातील लासलगाव आणि पिंपळगाव बाजार समिती देशातील प्रमुख कांदा उलाढाल होणा-या बाजार समित्या आहेत. सध्या अतीवृष्टीने खरीप कांदा आला नाही. उन्हाळ कांदा देखील खराब झाला. त्यामुळे शेतकरी, कांदा उत्पादक यांच्याकडे कांदाच शिल्लक नाही. त्यामुळे कांदा आवक अत्यंत कमी आहे. त्यामुळे भाव वाढत होते. त्याला आळा घालण्यासाठी केंद्र शासनाने कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला. निर्यातबंदी केली. त्याची झळ कांदा उत्पादक शेतकरी, व्यापारी दोन्ही वर्गांना बसली. त्याबाबत शेतकरी संतप्त आहेत. नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी आंदोलन सुरु आहे. केंद्र शासनापर्यंत ही असंतोषाची धग पोहोचली आहे. 

या पार्श्‍वभूमीवर नुकताच अफगानीस्तान, तुर्कस्तानचा कांदा बाजारात आला आहे. हा कांदा थेट बाजार समित्यांच्या व्यापारी वर्गाकडून स्थानिक कांद्यात मिसळून त्याची विक्री केली जात होती. त्याच्या बातम्या आल्याने यासंदर्भात मंत्री छगन भुजबळ यांना पत्रकारांनी विचारणाकेली होती. याविषयी ते म्हणाले, केंद्र सरकारने कांदा आयात करायचा आदेश दिला आहे. तो कांदा कुठे विक्री करायचा हा व्यापा-यांचा प्रश्‍न आहे. मात्र बाजार समित्यांत हा कांदा विक्री कसा होतो. बाजार समित्या या शेतक-यांच्या आहेत की व्यापा-यांच्या?. यासंदर्भात बाजार समित्यांच्या संचालक मंडळाने लक्ष घातले पाहिजे. त्यांनी शेतक-यांचे हित पाहिले पाहिजे. व्यापा-यांनी देखील असा कांदा विक्री करु नये, असे आवाहन त्यांनी केले.

दिवाळीचा सण असतांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेकडून होणारा धान्याचा पुरवठा थांबला आहे. स्वस्थ धान्य दुकानांत धान्याचा पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी आहे. यासंदर्भात लवकरच पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पंजाबमध्ये शेतकरी आंदोलन सुरु आहे. त्यामुळे रेल्वे वाहतूक व्यवस्थेवर त्याचा परिणाम झाला. धान्याची वाहतूक थांबली आहे. प्रशासनाकडून पर्यायी व्यवस्था केली जात आहे, असे भुजबळ म्हणाले.
...       
 

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख