संचारबंदीत विनाकारण फिरणाऱ्यांची अँटिजन टेस्ट..कोविड सेंटरमध्ये रवानगी - Antigen test of those who walk in the curfew without any reason  | Politics Marathi News - Sarkarnama

संचारबंदीत विनाकारण फिरणाऱ्यांची अँटिजन टेस्ट..कोविड सेंटरमध्ये रवानगी

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 15 एप्रिल 2021

अँटिजन टेस्ट करुन त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास पोलिस त्यांची रवानगी कोविड सेंटरमध्ये करीत आहेत.

जळगाव :  राज्यात संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. या काळात विनाकारण बाहेर  फिरणाऱ्या लोकांवर पोलिस कारवाई करत आहे.  मात्र, जळगाव पोलिसांनी कारवाई ऐवजी कोरोनाची अँटिजन टेस्ट करण्याची नवीन शक्कल लढवली आहे.   ज्या व्यक्ती संचारबंदीत विनाकारण घराबाहेर पडत आहेत. अशांची अँटिजन टेस्ट करुन त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास पोलिस त्यांची रवानगी कोविड सेंटरमध्ये करीत आहेत.

संचारबंदी काळात विनाकारण बाहेर फिरणाऱ्या लोकांवर पोलिस लाठीचा प्रसाद देत असतात यावर जनेतकडून टीकाही होत असते. त्यामुळे जळगाव पोलिसांनी अनोखा उपक्रम सुरू केला आहे. संचारबंदी काळात पोलिसांनी रस्त्यावर नाकेबंदी केली आहे. प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात आहे. जे कोणी विनाकारण फिरताना आढळले त्यांची त्याच ठिकाणी अँटीजन टेस्ट करण्यात येते. त्याच्या अहवालावरून त्या व्यक्तीची तातडीने रुग्णालयात उपचार करण्यासाठी रवानगी करण्यात येते. 

आतापर्यंत साधारण १५० जणांना उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. विनाकारण बाहेर फिरणारे हे लोक पॅाझिटिव्ह असल्यास प्रवाही ठरतात या तपासणी मुळे त्यांना आळा बसेल तसेच विनाकारण बाहेर फिरणाऱ्या लोकांची संख्या कमी होईल. पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शाखाली ही कारवाई करण्यात येत आहे.  जनतेकडून या कारवाईचे स्वागत होत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी राज्य सरकारने कडक पावल उचलली आहेत. राज्यात दिवसागणिक वाढणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या पाहता महाराष्ट्राची चिंता अधिकच वाढली आहे.  ही कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने राज्यात ‘ब्रेक दि चेन’ही मोहिम हाती घेतली आहे.

हेही वाचा : मृतकांच्या आकड्यातही गौडबंगाल..प्रशासन-स्मशानभूमीच्या माहितीत तफावत
अकोला : गेल्या महिन्याभरात राज्यात मोठ्या प्रमाणावर करोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यात मृतांचा आकडा देखील वाढत असल्यामुळे प्रशासनासमोर मृत्यूदर कमी करण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे. अकोला जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले  आहे.  दररोज रुग्णांचा बळी जात आहे, मात्र प्रशासनाकडून दर्शविण्यात येणारी मृतकांची संख्या आणि स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केल्या जाणाऱ्या मृतकांच्या संख्येत बुधवारी लक्षणीय तफावत दिसून आली. याची शहानिशा केली असता, मृतकांच्या आकड्यात गौडबंगाल असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख