Annabhau Sathe have made big change in labour life | Sarkarnama

कष्टक-यांच्या जीवनात अण्णाभाऊ साठेंचे योगदान अत्यंत मोलाचे

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून तसेच लोककलेतून सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी दिलेलं योगदान अत्यंत मोलाचे  आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

नाशिक : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून तसेच लोककलेतून सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी दिलेलं योगदान अत्यंत मोलाचे  आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त श्री भुजबळ यांनी आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस हार अर्पण करत अभिवादन केले. त्यावेळी ते म्हणाले, की, अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा आणि कादंबरी हे साहित्यप्रकारही त्यांनी ताकदीने हाताळले. तांत्रिकदृष्ट्या पूर्ण निरक्षर, अशिक्षित व्यक्ती, अशा अण्णाभाउंनी मराठी साहित्यातील लोकवाङमय, कथा, नाट्य, लोकनात्य, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले. तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचं श्रेय अण्णाभाऊंना दिले जाते. पोवाडे, लावण्या, गीतं, पदं या काव्यप्रकारांचा त्यांनी सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी वापर केला. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली. यंदा आण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष असून राज्यभर विविध सामाजिक कार्यक्रम राबविण्यात यावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, माजी आमदार जयवंतराव जाधव, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, बाळासाहेब कर्डक, कविता कर्डक, संजय खैरनार, शंकर मोकळ, भालचंद्र भुजबळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.
...
 

https://scontent-frt3-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_4607380974576...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख