...आणि भारतात रेल्वे धाऊ लागली, तेव्हा काय घडले माहितीये का?  - ...And Rail starts its History In India | Politics Marathi News - Sarkarnama

...आणि भारतात रेल्वे धाऊ लागली, तेव्हा काय घडले माहितीये का? 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

भारतात आधुनिकतेचे, राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक असलेल्या मध्य रेल्वेने आज प्लॅटिनम वर्षात प्रवेश केला आहे. ग्रेट इंडियन पेनीनसुला अर्थात "जीआयपी' रेल्वेची उत्तराधिकारी असलेली मध्य रेल्वे सध्या महाराष्ट्रात पाच विभागांत 466 स्थानकांचा विस्तार असलेली रेल्वे आहे.

नाशिक : भारतात आधुनिकतेचे, राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक असलेल्या मध्य रेल्वेने आज प्लॅटिनम वर्षात प्रवेश केला आहे. ग्रेट इंडियन पेनीनसुला अर्थात "जीआयपी' रेल्वेची उत्तराधिकारी असलेली मध्य रेल्वे सध्या महाराष्ट्रात पाच विभागांत 466 स्थानकांचा विस्तार असलेली रेल्वे आहे. ही भारतातील पहिली रेल्वे असल्याने तीचा इतिहास व प्रवास तेव्हढाच रंजक आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रम होणार आहेत. 

"जीआयपी' रेल्वेसाठी 1 ऑगष्ट 1949 कंपनी कायदा अस्तित्वात आला. त्यासाठी 1847 मध्ये ब्रिटीश संसदेत खास कायदा मंजूर करण्यात आला होता. पन्नास हजार पौंडाचे भांडवल असलेली ही कंपनी इस्ट इंडिया कंपनीची सहयोगी संस्था म्हणून कार्यरत झाली. आशिया कंडातील आणि भारतातील पहिली रेल्वे गाडी मुंबई ते ठाणे दरम्यान शनिवार, 16 एप्रिल 1853 रोजी दुपारी 3:35 वाजता धावली. त्या दिवसाला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती. बोरीबंदर येथून निघणा-या स्थानकांत लोकांची प्रचंड गर्दी झाली होती. बंदराच्या तटबंदीवरून बॅन्ड वाजविण्यात आला. रायफलीतूनहवेत गोळीबार करण्यात आला. सिग्नल मिळाल्यावर ही चौदा डब्यांची गाडी चारशे प्रवाश्‍यांना घेऊन सुलतान, सिंध आणि साहीब या तीन लहान इंजिनांनी ओढली. बोरीबंदर ते ठाणे हे एकवीस मैलांचे अंतर तीने सत्तावन्न मिनीटांत पुर्ण केले. तेव्हा बोरीबंदर स्थान लाकडी होते. त्यातून भारतातील रेल्वे युगाची पहाट झाली. 

जसजशी वर्षे गेली तसतसे ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेचा विस्तार झाला. 1900 साली "जीआयपी' रेल्वे कंपनीमध्ये भारतीय मिडलॅंड रेल्वे कंपनीचे विलीनीकरण झाले. त्याच्या सीमांचा उत्तरेकडे दिल्ली, ईशान्येकडे कानपूर आणि अलाहाबाद आणि पूर्वेकडे नागपूर, दक्षिण-पूर्वेत रायचूरपर्यंत विस्तार करण्यात आला. अशाप्रकारे, मुंबई येथून भारताच्या जवळ जवळ सर्व भागात रेल्वेचे संपर्क जाळे झाले.

"जीआयपी' चे मायलेज (रेल्वेमार्ग) दोन हजार 575 कि.मी. आहे. 5 नोव्हेंबर 1951 रोजी निजाम राज्य (हैद्राबाद), सिंधिया राज्य (ग्वाल्हेर) आणि धौलपूर राज्य (राजस्थान) रेल्वे एकत्रित करून मध्य रेल्वेची स्थापना "जीआयपी' रेल्वेने केली. मध्य रेल्वे उपनगरीय रेल्वे नेटवर्कने मुंबई शहराच्या सामाजिक, आर्थिक वाढीसाठी अग्रगण्य भूमिका बजावली आहे. भारतातील द्रुतगती परिवहन प्रणालीच्या आगमनाची नोंद देखील केली आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमधून 4151.93 कि.मीचे जाळे आहे. रेल्वेचे मुंबई उपनगरी नेटवर्क हे दररोज अंदाजे साडेचार दशलक्ष प्रवासी वाहून नेणारे जगातील सर्वात मोठे नेटवर्क आहे. मध्य रेल्वेचे मुंबई, भुसावळ, नागपूर, सोलापूर, पुणे असे पाच विभाग 466 स्थानकांचे नेटवर्क सध्या आहे. 
... 

https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख